'महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय', आरोह वेलणकरणचा पुन्हा ट्विट बॉम्ब.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actor aroh welankar said its time up for mahavikas aghadi

'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय', आरोह वेलणकरणचा पुन्हा ट्विट बॉम्ब..

eknath shinde : (Aroh velankar) अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली दोन दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्याने भाष्य केले आहे. काल त्याने ट्विट करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. आता थेट त्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (actor Aroh velankar tweeted about mahavikas aghadi)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. काल पर्यंत ३३ आमदारांचा पाठिंबा असणारे शिंदे रात्री ४० आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे रवाना झाले. शिंदे यांनी सेनेपूढे तीन मागण्या ठेवल्या आहेत. शिवाय त्यांच्याकडे मोठा पाठिंबा असल्याने सेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. आता तर शिंदे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आज रात्री पर्यंत ५० आमदार माझ्या बाजूने असतील अशी खात्री शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे. यामुळे सरकार पडण्याचे चांगलेच संकेत दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोहने महाविकास आघाडी वर निशाणा साधला आहे. (marathi actor aroh velankar said its time up fo mahavikas aghadi)

या घडामोडीवर आरोह म्हणतो 'महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, चला पाहू पुढे काय होतंय?' असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. नुकतेच आरोहने एकनाथ शिंदेंना उद्देशून एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने 'परत जाऊ नका, म्हणजे मिळवलं' असे खोचक विधान केले होते.

Web Title: Marathi Actor Aroh Welankar Said Its Time Up For Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top