'काय करायचं ह्याचं? सांगा...'; अजानमुळे आरोह वेलणकरची झोपमोड

aroh welankar
aroh welankar

मशिदीमध्ये होणाऱ्या अजानच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे दररोज झोपमोड होत असल्याची तक्रार मराठी अभिनेता आरोह वेलणकरने केली आहे. आरोहने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत याविषयी तक्रार केली आहे. बुधवारी अजानच्या वेळीच त्याने हा व्हिडीओ शूट करून ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे त्याने या ट्विटमध्ये मुंबई पोलीस, महानगरपालिका, आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालय, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सर्वांना टॅग केलंय. 

'काय करायचं ह्याचं? सांगा... पोलिसांना सांगून पण काही होत नाही', असं त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय. या व्हिडीओत त्याने मशिदीमधून मोठ्या आवाजाने होणाऱ्या अजानचा आवाज ऐकवला. "मी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये मी पठाणवाडीतल्या माझ्या घरात मशिदींमध्ये होणाऱ्या अजानच्या आवाज येत असल्याचा उल्लेख केला होता. आता पहाटे सहा वाजता किती मोठा आवाज येतोय हे तुम्ही स्वत: ऐका. मला इथे राहून अडीच वर्षे झाली आणि रोज दिवसभरातून चार ते पाच वेळा अजानचा इतका मोठा आवाज येतो. इथे सगळ्यांची झोपमोड होतेय. हे कायद्याविरोधात आहे. मी दोन दिवसांपूर्वी पोलिसांतही तक्रार केलीये. त्यानंतर एक दिवस आवाज बंद झाला आणि आता पुन्हा सुरू झालंय. याचं काय करायचं सांगा", असा सवाल त्याने केलाय. 

याआधी गायक सोनू निगमनेही लाऊडस्पीकरवरील अजानमुळे त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. अजानविरोधात सूर आळवताना त्याने इतर धार्मिक स्थळांवर होणाऱ्या लाऊडस्पीकरच्या आवाजावरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com