Lalit Prabhakar: शर्टलेस सीन असल्याशिवाय काम करत नाहीस? यावर ललित प्रभाकर म्हणाला...

ललित प्रभाकर सध्या शांतीत क्रांती 2 या वेबसिरीजमध्ये झळकत आहे
marathi actor lalit prabhakar opens up about shirtless scene in shantit kranti 2 webseries
marathi actor lalit prabhakar opens up about shirtless scene in shantit kranti 2 webseries SAKAL
Updated on

Lalit Prabhakar News: ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातला चर्चेतला अभिनेता. ललितला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय.

ललित सध्या शांतीत क्रांती 2 या वेबसिरीजमध्ये झळकत आहे. यानिमित्ताने ललित सोबत सकाळने खास गप्पा मारल्या. त्यावेळी ललित सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये असलेल्या शर्टलेस सीनविषयी बोलता झाला.

(marathi actor lalit prabhakar opens up about shirtless scene in shantit kranti 2 webseries)

marathi actor lalit prabhakar opens up about shirtless scene in shantit kranti 2 webseries
Viral News: शेतातील डान्सचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की मूळ गायकापर्यंत तो पोहोचला, मग पुढे घडलं असं काही की...

शर्टलेस सीन शिवाय काम करत नाही? ललित म्हणाला...

सकाळला दिलेल्या मुलाखतीत ललितला प्रश्न विचारण्यात आला की, "अभिनय वगैरे सर्व ठीक आहे. पण पहिल्या सीझनमध्ये तुझ्या शर्टलेस सीन्सची बरीच चर्चा झाली. तर त्याविषयी काय सांगशील?"

यावर ललितने हसत उत्तर दिलं की,"अरे लिहीलंय तसं. लिहूनच त्यांनी आपलं एक TRP सेट करुन ठेवलाय. खास वेगळं मला सांगितलंय."

ललितला मध्येच थांबवत याच वेबसिरीजमधील त्याचा सहकलाकार अभय महाजन म्हणाला, "पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ललितने स्वतःच एक अट ठेवली होती की शर्टलेस सीन असल्याशिवाय मी काम करत नाही." असा गमतीशीर खुलासा अभयने केला. यावर ललित खळखळून हसला.

शांतीत क्रांती 2 विषयी थोडंसं

पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

१८ महिन्‍यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना लग्न करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्‍ही मुले श्रेयसच्‍या लग्नानिमित्त इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे ठरवतात.

अशातच प्रसन्‍नने (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे, मग पुढे एकच गोंधळ उडतो. एकूणच शांतीत क्रांती 2 मध्ये विविध ठिकाणांची सफर घडणार असुन प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

marathi actor lalit prabhakar opens up about shirtless scene in shantit kranti 2 webseries
Ind Vs Pak: तिकडे पाकिस्तान ऑलआऊट अन् इकडे प्रेक्षक क्लीन बोल्ड, उर्वशीच्या रुपात स्टेडियममध्ये निळं वादळ

शांतीत क्रांती 2 कुठे पाहायला मिळेल ?

शांतीत क्रांती 2 ही वेबसिरीज १३ ऑक्टोबरला सर्वांच्या भेटीला आली आहे. ही वेबसिरीज सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. या वेबसिरीजमध्ये ललित प्रभाकर, अभय महाजन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले असे कलाकार पाहायला मिळत आहेत. TVF आणि भाडिपाने मिळून या वेबसिरीजची निर्मिती केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com