Lalit Prabhakar News: 'इथलं जेवलात की अर्धे पहलवान झालात म्हणून समजा..',पुण्यातील 'त्या' हॉटेलच्या प्रेमात पडला ललित Lalit Prabhakar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalit Prabhakar News

Lalit Prabhakar: 'इथलं जेवलात की अर्धे पहलवान झालात म्हणून समजा..',पुण्यातील 'त्या' हॉटेलच्या प्रेमात पडला ललित

Lalit Prabhakar News: मराठी सिनेमातला हॅन्डसम हंक ललित प्रभाकरच्या यंग क्राऊड भलतंच प्रेमात आहे. त्यात त्याच्या फिमेल फॅन्स जरा जास्तच आहेत. मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारा ललित सध्या मराठी सिनेमांत आपली चमक दाखवताना दिसत आहे.

नुकताच त्याचा रावडी लूकवाला 'टर्री' सिनेमा येऊन गेला. सिनेमानं बॉक्सऑफिसवर फार काही कमाल दाखवली नसली तरी नेहमीच चॉकलेट बॉय इमेजमध्ये जास्तकरून दिसलेल्या ललितचा रावडी अंदाज मात्र अनेकांना पसंत आला.

'सनी' सिनेमातील ललितच्या भूमिकेनं देखील प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अर्थात सध्या ललितच्या सिनेमांकडे प्रेक्षक फारसे फिरकत नसले तरी त्याच्या पर्सनॅलिटीचे मात्र दिवाने भरपूर आहेत.(Marathi Actor Lalit Prabhakar Post on Pune hotel food)

ललित प्रभाकर सोशल मीडियावर भलताच सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो अनेकदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी पोस्ट करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतो.

नुकतीच त्यानं पुण्यातील एका हॉटेलच्या जेवणाची प्रशंसा करणारी पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं आखाड्याचा उल्लेख देखील केला आहे. तशी थीम त्या जागेची असावी बहुधा.

अर्थात ललित मुबंईकर असल्यानं पुण्याच्या प्रेमात पडल्यानं सोशल मीडियावर याची चर्चा तर झालीच पाहिजे नाही का. चला पुण्यातील त्या कोणत्या हॉटेलातील जेवणाविषयी नेमकं काय बोललाय ललित प्रभाकर जाणून घेऊया.

ललित प्रभाकरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय,सुप्रभात

या आखाड्यात!

@dehaatipune चं जेवण जेवलात की अर्धे पहलवान झालात म्हणून समजा.

अद्भूत जेवण💯👼🏼

खटक्यावर बोट जागेवर पलटी

PC @nachiket_chidgopkar

#मुदगल #तालीम #mudgal