esakal | फर्जंद, फत्तेशिकस्त मधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Navnath Gaikwad

फर्जंद, फत्तेशिकस्त मधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक कलाकरांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनेक कलाकारांनी त्यांचा जीव गमावला आहे. नुकतीच चित्रपट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केली. या पोस्टमुळे मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेकांना धक्का बसला.

फर्जेंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कालाकार नवनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.नवानाथ यांचा रूग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले. ' फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. ' या पोस्टला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी नवनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नवनाथ हे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमिका साकारत होते. नवनाथ यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जेद चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद परिहार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अनेक सेलिब्रेटी कोरोना काळात लोकांना कोरोनाच्या नियामंचे पालन करण्यास सांगत आहेत. कोरोना रूग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे वैद्यकिय सुविधांचा तुटवडा भासत आहे. अशा वेळी अनेक जण आपला जीव गमवत असल्यानं लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झाले होते. अमोल यांच्या निधनाची बातमी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण सध्या थांबवले आहे.

loading image