Ravindra Berde: "आमचं नाटक अर्ध्यावर सोडून ते उठले कारण..." अभिनेत्याने रविंद्र बेर्डेंविषयी सांगितला भावनिक प्रसंग

रविंद्र बेर्डेंविषयी मराठी अभिनेत्याने भावनिक आठवण सांगितली आहे
marathi actor prasad barve emotional post for late actor ravindra berde
marathi actor prasad barve emotional post for late actor ravindra berde eSakal
Updated on

Ravindra Berde Passed Away: रवींद्र बेर्डे यांचं काल १३ डिसेंबरला वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने अनेक कलाकार त्यांच्याविषयी भावुक आठवणी शेअर करत आहेत. अशातच सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नियम व अटी लागू या नाटकातील अभिनेता प्रसाद बर्वेने एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.

प्रसाद लिहीतो,"काल नियम व अटी लागू ह्या प्रयोगाच्या वेळी घडलेला एक खूपच भावनिक प्रसंग..... काल आम्ही रत्नागिरी इथे प्रयोग करणार होतो आणि ध्यानीमनीही नसताना हॉटेलमध्ये भेट झाली पुरू दादा म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे सरांची म्हणाले आज मी रत्नागिरीत तुमचे नाटक बघणार आहे मला नाटकात बघूनही ते खुश होते म्हणाले बर्याच वर्षांनी तुला नाटकात पाहतोय good...

प्रसाद पुढे लिहीतो, "ह्याच आनंदात नाटकाचा प्रयोग सुरू झाला पुरू दादा अगदी पहिल्या रांगेत चैरवर बसले होते नाटक जोरदार सुरू झालं हश्या म्हणू नका टाळ्या म्हणू नका सगळं जोरदार सुरू होत आणि मग interval मधे आला एक खूप वाईट ट्विस्ट पुरू दादा आत आले आणि म्हणाले मला जरा दमल्यासारख वाटतंय दिवसभर काम झालंय आणि responce बघता प्रयोग लवकर संपेल अस काही वाटत नाही खूप रंगणार प्रयोग त्यामुळे पुढचा अंक मी नंतर कधी तरी मुंबईत बघीन आम्हाला काही कळेच ना संक्याने तर विचारलंही आम्ही बर करत नाही आहोत का सर त्यावर खूप ऑकवर्ड होऊन सर म्हणाले नाही रे मुलांनो तुम्ही तिघही उत्तम करताय फक्त थोडा थकवा जाणवतो आहे म्हणून निघतोय शेवटी एक हाडाचा दिग्दर्शक आणि नाटककार माणूस असे मधे कस जाणार तरी मोठ्या मनाने आम्हाला सांगून ते निघाले तरी मी दोनदा सराना विचारलं तुम्ही बरे आहात ना सर काही होत नाहीये ना अरे नाही रे फक्त थकलोय निघतो अस म्हणाले आणि गेले..."

प्रसाद शेवटी लिहीतो, "प्रयोग पुन्हा तितक्याच जोमाने सुरू झाला तितक्याच उत्साहात आणि हाऊसफुल्ल गर्दीच्या standing ovation ne samplahi पण तरी पुन्हा एकदा तेच पुरू दादा का गेले शेवटी मी आमचा मित्र गिरीश महाजन ह्याला विचारले सर बरे आहेत ना रे प्रयोगा दरम्यान ही मी एक दोनदा त्याला विचारले शेवटी न राहवून त्याने सांगितले अरे पुरू दादांचा भाऊ म्हणजे आपले लाडके रवींद्र बेर्डे नुकतेच गेले आणि त्यामुळे त्यांना जावं लागल पण त्यांनी बजावल होत नाटक संपल्यावर सांग शेवटी डायरेक्टर माणूस तो असा कसा आम्हाला टेंशन देऊन जाईल त्यामुळे इतक्या कठीण प्रसंगातही आम्हाला भेटून apprciate करून आम्हाला काही कळू न देता वाईट वाटणार नाही ह्याची काळजी घेत आपल्या भावाला कायमचा निरोप देण्यासाठी गेलेल्या पुरू दादांना शतदा वंदन

रवींद्र बेर्डे काका म्हणजे ज्यांच्या बरोबर मी चिकट नवरा ह्या माझ्या पहिल्या वहिल्या सिनेमात पहिला वहिला शॉट शूट केला असे बेर्डे काका...काका तुम्ही कायम स्मरणात रहाल...."

या कारणामुळे रविंद्र बेर्डे यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण पुढे उपचार घेऊन घरी आल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com