अभिनेता सागर कारंडेवर का आली ही वेळ.. दिसला इथे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sagar karande

अभिनेता सागर कारंडेवर का आली ही वेळ, दिसला इथे..

Sagar karande : बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रिया मराठे या पाठोपाठ आता या अभिनेत्यानेही लोकलमधील फोटो शेअर केले आहेत. सध्या लोकल प्रवासातील फोटो समाजमाध्यमांवर टाकायचा सपाटाच लावला आहे. या निमित्ताने एक नवा ट्रेंड कलाकारांमध्ये सुरु झाला आहे.

हेही वाचा: सई ताम्हणकरचा मिस्ट्री मॅन कोण? चाहत्यांनी दिली 'हिंदुस्थानी भाऊ'ची उपमा

मनोरंजनविश्वातील कलाकार सहसा जनमानसात येत नाहीत. चित्रीकरण, इव्हेन्ट यामध्ये कायम वैयक्तिक वाहनाचाच ते वापर करतात. पण कधीतरी काही प्रसंगांमुळे किंवा सहजच अनुभव म्हणून काही कलाकार सार्वजनिक वाहनाने प्रवास करत आहेत. या प्रवासात आलेले अनुभव आणि त्याचे फोटोही कलाकार आवर्जून शेअर करतात.

हेही वाचा: आलिया-रणबीरचं पारंपरिक लग्न! 'या' पद्धतीत रंगणार विवाहसोहळा

सध्या नाटक, मालिका, चित्रपट यामुळे लाइमलाइट मध्ये असलेला सागर कारंडे स्वत:ची गाडी सोडून चक्क सार्वजनिक वाहनातून फिरताना दिसला आहे. त्यावर ही वेळ नेमकी का आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकताच त्याने (sagar karande) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये पाठीवर बॅग लावून तो लोकलने प्रवास करत आहे.

हेही वाचा: आलिया-रणबीरचा विवाहसोहळा 13 ते 17 एप्रिल दरम्यान कपूर मेन्शनमध्ये रंगणार

या फोटोला त्याने 'नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकल ने प्रवास...' असे कॅप्शन दिले आहे. चित्रीकरणाहून नाटकाला वेळेच पोहोण्यास उशीर होत असल्याने त्याने लोकलची वाट धरली. हा फोटो त्याच्या चाहत्यांमध्ये बराच व्हायरल झाला असून त्याच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

नुकताच अभिनेता (nawazuddin siddhiqui) चित्रीकरणाहून इव्हेन्टला वेळेत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास करताना दिसला होता. त्यानंतर 'झिम्मा' या चित्रपटातून नुकतीच आपल्या भेटीला येऊन गेलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) हीने देखील आपल्या लोकल प्रवासाचे फोटो शेअर केले होते. यावेळी तिची आई तिच्यासोबत होती. तर अभिनेत्री प्रिया मराठेचेही लोकलमधील फोटो व्हायरल झाले होते. अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही (mukta barve) रिक्षातून प्रवास केल्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

Web Title: Marathi Actor Sagar Karande In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top