'मला त्या "आदित्य"ला धडा शिकवायचाय'; संजय मोने यांची आगपाखड

LG कंपनीने दिलेल्या वागणुकीमुळे संजय मोनेंचा संताप अनावर
sanjay mone FB post esakal news
sanjay mone FB post esakal news

प्रसिद्ध मराठी अभिनेता संजय मोने (Sanjay Mone) यांना LG कंपनीचा चक्रावून टाकणारा अनुभव नुकताच आला आहे. अलिकडेच संजय मोने यांच्या वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) बिघाड झाल्याची तक्रार त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरकडे (customer care) केली. मात्र, कंपनीच्या एक्झिक्युटिव्हने आरेरावीपणे त्यांच्याशी बोलत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. या प्रसंगानंतर संजय मोने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. सोबतच या एक्झिक्युटिव्हला धडा शिकवण्यासाठी काय करता येईल, असा सल्लाही त्यांनी नेटकऱ्यांना विचारला आहे. (marathi actor sanjay mone shares experience of lg customer care washing machine complaint)

sanjay mone FB post esakal news
गुजरात पॅटर्न; तयार केला दीड लाखांचा मशरुम

काही दिवसांपूर्वी संजय मोने यांच्या घरातील वॉशिंग मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. हे मशीन वॉरंटी पीरिएडमध्ये असल्यामुळे त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावेळी आदित्य नामक एक्झिक्युटिव्हने मोने यांच्याशी आरेरावीपणे बोलत 'जो करना है करलो', असं म्हटलं. त्यानंतर संजय मोने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

LG कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं. कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक! चक!असा आवाज येतोय.म्हणून मी LG customer care ला फोन केला.warranty period मध्ये आहे असं सांगितलं.समोर आदित्य नावाचा माणूस (an executive) बोलत होता.माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला "lock down मुळे आम्ही warranty वगैरे सगळं देऊ शकत नाही.पण तुम्ही जर येणा-या माणसाचे ४७५ रु.अधिक जर काही भाग खराब झाला असेल,त्याचे पैसे द्यावे द्यावे लागतील.मग warranty ला काय अर्थ आहे?त्यावर मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला "जो करना वोह करलो.नही तो lock down के बाद आदमी आयेगा.आता यावर पुढे काय करता येईल?मला त्या "आदित्य"ला धडा शिकवायचाय.l ock down काही आपण नाही घोषित केला ना?आपल्या भल्या साठी तो आहे.शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये..ती चालूच आहे.पुढे काय करू?यावर फालतू विनोदी उत्तरं नकोत.., अशी पोस्ट संजय मोने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर संजय मोने यांची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. सोबतच अनेकांनी कंपनीच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com