Sanket Korlekar: चॅनेलने "काही" दगडांना मुख्य भूमिकेत संधी दिली, नाव न घेता मराठी अभिनेत्याचा संताप

Sanket Korlekar
Sanket KorlekarEsakal
Updated on

मराठी मनोरंजन विश्वातील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा' या लोकप्रिय मालिकेतून बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका साकारुन अभिनेता संकेत कोर्लेकर हा घराघरात पोहचलेला आहे. त्याने केवळ याच मालिकेत नव्हे तर स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'अजूनही बरसात आहे' सारख्या प्रसिद्ध मालिकेतही आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली आहे.

केवळ मालिकाच नाही तर संकेत हा 'टकाटक', 'आय पी एस' सारख्या चित्रपटांमध्येही झळकला आहे. संकेतने 'शिवबा', 'मराठी पाऊल पडले पुढे' या नाटकांमध्येही काम केले आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या मुरडच्या संकेतसाठी अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा हा इतका सोपा प्रवास नव्हता.

संकेतने सोशल मिडीयावर पोस्ट करत सध्याच्या मराठी मालिकांमध्ये जे कास्टींग चालतं त्यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केलीय.

Sanket Korlekar
Ed Sheeran: प्रसिद्ध गायकाने मृत्यूपुर्वीच खोदून ठेवलंय स्वत:चं थडगं! कारण सांगत म्हणाला

संकेत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहितो की,

तुम्ही "ग्लॅमरस" आहात असे तुम्हाला वाटतंय ? तुम्हाला सुद्धा अभिनेता व्हायचंय ? पण अभिनय येत नाही ? काहीच हरकत नाही.. ठोकळा असो वा मतिमंद..दगड असो वा माती.. आमच्या येथे नवीन चॅनेल असल्याने सगळ्या "काही" दगडांना मुख्य भूमिकेत संधी दिली जाईल.

अभिनय बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शक आहेच त्यामुळे कलाकार कसेही असले तरी चालतील. जुन्या कलाकारांनी संपर्क साधू नये तुमचा पर डे आम्हाला झेपणार नाही आणि तुम्ही आमच्या पर डे मध्ये काम करायला तयार जरी झालात तरी ऐनवेळेस आम्ही तुम्हाला टांग देऊ कारण आम्ही नवीन चॅनेल आहोत आमच्यासाठी सगळं माफ आहे.

परेलल लीड मुद्दाम आम्ही ओळखीचा चेहरा घेतो जेणेकरून त्यांच्या अभिनयाने मुख्य भूमिकेतील ठोकळ्यांची माती पुसली जाईल त्यामुळे जुने कलाकार असाल तर प्लिज..लायकी फक्त तेवढी लक्षात ठेवा..मुख्य भूमिकेत आपले पाय पसरवायला येऊ नका.

चला तर मग वाट कसली बघताय.. ग्लॅमरस असाल तर नवीन चॅनेल कडे धाव घ्या.. आणि शे पाचशे मध्ये ठोकळ्याला आकार मिळवून घ्या.

टीप : अभिनेता ह्या शब्दाची खरी किंमत कळत असेल तरच ही पोस्ट मनाला लावून घ्या नाहीतर नवीन चॅनेल जसे प्रोडक्शन च्या निर्णयांना इग्नोर करतं तसे इग्नोर करा.

Sanket Korlekar
Aarti Solanki: बिग बॉस फेम आरतीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! तब्बल 132 किलो वजन...
Sanket Korlekar
Ranbir Kapoor: रणबीर कपूर ED च्या समन्सने बिथरला, पापाराझींवर केली आगपाखड, व्हिडीओ बघाच

सध्या संकेतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत. एकानं लिहिलंय, "खरं आहे ,बरोबरच बोलताय तुम्ही ,सोन्याची किंमत नसते लोकांना ...त्यांना कथिल कळते ,प्रत्येकाची वेळ येत असते ,नो प्रॉब्लेम", तर दुसऱ्याने लिहिलंय की, "दुदैवाने हे खरं आहे."

संकेतने त्याच्या शरीरावरही खुप मेहनत घेतली आहे. त्याने मेहनतीच्या जोरावर आज मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केली आहे. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील मल्हारची भुमिका प्रेक्षकांना खुपच आवडली होती. संकेतने लिहीलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com