
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे रविवारी लग्न होत आहे.
पुणे - सध्या लगीनसराईचा हंगाम असून सगळीकडेच सनई चौघड्यांचा आवाज आहे. कोरोनामुळे यावर थोड्या मर्यादा असल्या तरीही थाटमाट काही कमी नाही. नव्या वर्षात मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आता मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे रविवारी लग्न होत आहे. पुण्यात हा विवाहसोहळा होणार असून दोनच दिवसांपूर्वी त्यांचा हळदी समारंभ पार पडला.
हळदी समारंभासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते. सिदार्थ आणि मिताली यांनी हळदी समारंभादिवशी जोरदार डान्स केला. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिताली आणि सिद्धार्थने हळदी समारंभासाठी स्वॅग लुक केला होता. पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पिवळ्या रंगाच्या दागिन्यांमध्ये मिताली सुंदर दिसत होती तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.
हळदी सोहळ्यासह मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. मेहंदीच्या कार्यक्रमात सिद्धार्थ मितालीला जेवण खाऊ घालतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मितालीने तिच्या हातावरच्या मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे. टायनी पांडा हा हॅशटॅग वापरून मिताली आणि सिद्धार्थ नेहमीच फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे मितालीच्या मेहंदीमध्ये पांडाचे चित्र दिसत आहे.