Swwapnil Joshi च्या करिअरमधलं पहिलं व्हिझिटिंग कार्ड व्हायरल.. पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट..म्हणाला,'आता फक्त...'

स्वप्निल जोशीच्या या जुन्या व्हिझिटिंग कार्डची इमेज एका निर्मात्यानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. स्वप्निलही यावर कमेंट करत जुन्या आठवणीत रमला आहे.
Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card Viral
Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card ViralEskal

Swwapnil Joshi: मराठी अभिनेता स्वप्निल जोशी आता मराठीतला सुपरस्टार आहे. त्याला कुठल्याही व्हिझिटिंग कार्डची गरज नाही. पण एक काळ होता जेव्हा स्वप्निलनं आपलं करिअर मालिकाविश्वापासून सुरु केलं होतं..त्याच्या कृष्णाच्या भूमिकेनं हिंदी मालिकाविश्वात त्याचं नाव केलं होतं. त्याचं करिअर हळूहळू जोर धरत होतं.

त्याच वेळचा म्हणजे करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं स्वप्निलचं एक व्हिझिटिंग कार्ड व्हायरल होत आहे. ज्यावर स्वप्निल जोशी लिहिलं आहे आणि ते एका निर्मात्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टवर स्वत: स्वप्निलनं देखील कमेंट केली आहे. (Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card Viral)

Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card Viral
Parineeti-Raghav: परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा या आठवड्यात करणार एंगेजमेंट! दिल्लीत तयारी झाली सुरू

स्वप्निलचं हे व्हिझिटिंग कार्ड पोस्ट केलं आहे ते निर्माते डॉ.रामचंद्रन श्रीनिवासन यांनी. त्यांनी ही पोस्ट ट्वीटरवर केली आहे. आणि लिहिलं आहे की,''खूप वर्षापूर्वी अभिनेता स्वप्निल जोशी उर्फ कृष्णा मला भेटायला माझ्या ऑफिसला आला होता तेव्हा त्यानं मला हे व्हिझिटिंग कार्ड दिलं होतं''.

या श्रीनिवासन यांच्या पोस्टवर कमेंट करत स्वप्निलनं देखील लिहिलं आहे की, ''जुन्या चांगल्या आठवणी...मस्त वाटलं माझं पहिलं व्हिझिटिंग कार्ड पाहून''.

Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card Viral
Kangana Ranaut Lock upp 2: आता ओटीटी वर नाही तर 'या' वाहिनीवर प्रसारित होणार कंगनाचा 'लॉकअप 2', समोर आली रीलिज डेट
Marathi Actor Swwapnil Joshi First Visiting Card Viral
Kushal Badrike: एखादं प्रोजेक्ट मिळावं म्हणून दिग्दर्शकासमोर काय-काय करावं लागतं.., कुशलनं शेअर केला भन्नाट व्हिडीओ

स्वप्निलचं हे पहिलं व्हिझिटिंग कार्ड अगदीच साधं आहे,ज्याच्यावर फक्त 'स्वप्निल जोशी' हे नाव लिहिलं आहे. स्वच्छ पांढऱ्या रंगाचं हे कार्ड आहे.

चाहत्यांनी देखील या व्हायरल पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. एकानं मस्करी करत चक्क लिहिलं आहे,'आता कार्डची गरजच नाही फक्त नाकातून रक्त काढणारे जोशी म्हटलं तरी ओळख पटेल'.

स्वप्निल जोशी सध्या मालिका,सिनेमा,ओटीटी अशा प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कलाकृतीमधनं दिसतो. नुकताच त्याचा 'वाळवी' सिनेमा बॉक्सऑफिसवर कमाल करुन गेला. लवकरच 'वाळवी'चा पुढील भाग येत आहे.

तर स्वप्निलची 'तू तेव्हा तशी..' या मालिकेनं नुकताच आपला निरोप घेतला आहे. या मालिकेतील पट्या उर्फी सौरभ पटवर्धन या स्वप्निलच्या भूमिकेनं चाहत्यांना भुरळ घातली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com