#fomochallenge : मराठी कलाकारांनी घेतलेलं हे फोमो चॅलेंज नक्की आहे तरी काय?

marathi celebs took FOMO Challenge
marathi celebs took FOMO Challenge

मुंबई : सोशल मीडिया हा सर्वांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झाला आहे. सामान्य माणसं ते सेलिब्रिटींपर्यंत याच माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे अनेक घडामोडींसह, नव्या चित्रपटांमुळे आणि आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर अनेक गोष्टींचा ट्रेंड येतो. याचमाध्यमातून नेटकरी आणि सेलिब्रिटी वेगवेगळे 'चॅलेंज' घेताना दिसतात. कधी मजेशीर तर, कधी सामाजिक मुद्द्यांना हात घालणारे विषय यातुन हाताळले जातात. मराठी कलाकरांनीही आता एक मजेशीर चॅलेंज घेतलं आहे. पाहा कोणते कलाकार यामध्ये सामिल झाले आहेत आणि त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. 

मराठी इन्डस्ट्री नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते आणि  यातुनच आता मराठी कलाकार एक मजेशीर चॅलेंज घेऊन आले आहेत. #फोमोचॅलेंज असं त्याचं नाव असून यामध्ये अनेक मराठी दिग्गज कलाकार सामिल झाले आहेत. 

खरंतर FOMO ही संकल्पना डॉ. डॅन हर्मन यांनी 1996 यांनी जगासमोर आणली होती. 'फोमो' या शब्दाचा फुल फॉर्म 'Fear of Misisng out' असा आहे. याचा अर्थ असा की, सतत काहीतरी हरवल्याची किंवा कोणत्यातरी गोष्टीपासून मागे राहण्याची भीती.  

सोशल मीडियावर फोमो हे चॅलेंज जवळपास 2015 पासून जगभरातून केलं जात आहे. आता मात्र मराठी कलाकारांनी हे चॅलेंज पुन्हा सुरु करुन त्याचा ट्रेंड केला आहे. 

अभिनेता अमेय वाघ, रसिका सुनिल, ऋतुजा बागवे, पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, दिग्दर्शक संजय जाधव आणि असे अनेक कलाकार यामध्ये सामिल झाले आहेत. स्वत: चे अनुभव आणि त्यांना कोणत्या गोष्टीपासून हरवल्याची भीती किंवा भावना येते याविषयीचे काही मजेशीर तर काही गंभीर अनुभव चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

स्वत: चे अनुभव शेअर करणारे व्हिडीओ या कलाकरांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. एकदा हे व्हिडीओ तुम्ही नक्की ऐकाच ! लोकांना बोलतं करुन त्यांच्या मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी हे चॅलेंज नक्कीच एक चांगलं व्यासपीठ ठरलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here is my entry to the #FOMOchallenge. Watch the #FOMO on @shudhdesimarathi

A post shared by Sanjay S Jadhav (@sanjaysjadhav) on

किकी, डेले अॅली, वॉट दि फ्लफ, बॉटल कॅप, आइस बकेट, 10 इयर्स, पॅडमॅन चॅलेंज, नेयमार चॅलेंज हे काही फेमस चॅलेंजेस इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर यांवर करण्यात आले होते. यामध्ये हॉलिवूड,बॉलिवूड ते मराठी कलाकरांपासून सर्वच सामिल झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com