Alka Kubal: अलका कुबल बऱ्याच वर्षांनी मराठी नाटकात, धुळ्यात रंगणार भव्यदिव्य प्रयोग

अलका कुबल या अनेक वर्षांनी नाटकात काम करणार आहेत
alka kubal. alka kubal news, alka kubal natak
alka kubal. alka kubal news, alka kubal natakSAKAL

Alka Kubal News: अलका कुबल मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. अलका कुबल यांचे जुने नवे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. अलका कुबल या व्यावसायीक दृष्ट्या यशस्वी अभिनेत्री आहे.

पण व्ययक्तीक आयुष्यात सुद्धा अलका कुबल यांचं आयुष्य सुखी आहे. अलका कुबल या अनेक वर्षांनी नाटकात काम करणार आहेत आणि ते सुद्धा ऐतिहासिक भूमिकेत.

(marathi actress alka kubal new marathi natak)

alka kubal. alka kubal news, alka kubal natak
Oscars 2023 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर, टाळ्या आणि शिट्ट्या

अलका कुबल यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत अलका कुबल यांच्या हातात रत्नजडित तलवार असून त्यांनी भगव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यांच्या कपाळी चंद्रकोर आहे.

अलका कुबल यांनी हा फोटो शेयर करत त्यांच्या नव्या प्रोजेक्टची माहिती फॅन्सना सांगितली आहे. अलका कुबल अनेक वर्षांनी नाटकात अभिनय करत आहेत.

हा फोटो शेयर करत अलका कुबल यांनी कॅप्शन लिहिलंय कि.. राजमाता जिजाऊ, महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन, पुणे प्रस्तुत ऐतिहासिक महानाट्य “शिवशाही- मुद्रा भद्राय राजते” आयोजित केले आहे.

आपण सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. असं कॅप्शन अलका कुबल यांनी या फोटोला दिलंय.

alka kubal. alka kubal news, alka kubal natak
Tanvi Mundle: गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर खुले लाली गुलाबाची

२६ ते २८ मार्च धुळ्यातील एस. एस .व्ही .पी एस. कॉलेज मैदानात “शिवशाही- मुद्रा भद्राय राजते” नाटकाचा प्रयोग आयोजित केलाय. शिवशंभूशाहीर, महिंद्र वसंतराव महाडिक यांनी या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

या नाटकात अलका कुबल राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणार आहेत. अलका कुबल यांच्या या नवीन नाटकाचा भव्य दिव्य प्रयोग रंगणार आहे.

alka kubal. alka kubal news, alka kubal natak
Pratiksha Mungekar: रोज तुला पाहून प्रेमात पडतो.. कोकणची चेडवा प्रतीक्षा

अलका कुबल यांच्या आयुष्यात काहीच दिवसांपूर्वी एक सुखद घटना घडली. अलका कुबल यांची थोरली लेक ईशानी ही पायलट आहे.

तिला 2015 साली पायलटचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं आहे. आता अलका ताईंची धाकटी मुलगी कस्तुरी सुद्धा डॉक्टर झाल्याने आई म्हणून अलका ताईंना दोन्ही मुलींचा प्रचंड अभिमान वाटत असणार यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com