esakal | शेवंताबाईंची गोष्टच वेगळी होती,पम्मीचं तसं नाहीये'
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actress apurva nemalekar share post new serise tuz maz jamtay

तुझं माझं जमतंय' या मालिकेत आता अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, “पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत.

शेवंताबाईंची गोष्टच वेगळी होती,पम्मीचं तसं नाहीये'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ' रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे मराठी चाहत्यांच्या पसंतीस उतलेली 'शेवंताबाई' आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अपूर्वा नेमळेकरने काही रियालिटी शो मध्येही काम केले आहे. आता ती आपल्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 'तुझं माझं जमतंय'मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने इंट्री केली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणा-या अपूर्वाला यापूर्वी नेटक-य़ांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांना जशास तसे उत्तर अपूर्वाने दिले. तिच्या शेवंता नावाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळेच तिची लोकप्रियता वाढली.  तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

तुझं माझं जमतंय' या मालिकेत आता अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, “पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणणार आहे.”

पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. तिच्या पासून कोणालाच धोका नाहीये. पम्मी हि तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, असेही तिने अपूर्वाने यावेळी सांगितले.