esakal | गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण

बोलून बातमी शोधा

marathi actress celebrate festival of Gudi Padwa Prajakta Mali sonalee kulkarni Mrinmayee Deshpande.jpg

तुमच्या आवडत्या कलाकारांनी देखील हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला आहे.

गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा. या  दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभी करतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. तुमच्या आवडत्या कलाकारांनी देखील हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला आहे. चला तर मग, पाहूयात या सेलिब्रेटींनी गुढीपाडवा कसा साजरा केला. 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिच्या घरच्या गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिले, 'घरचा पाडवा...गुढी पाडवा'. या फोटोला सोनालीच्या चाहत्यांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहीले आहे,' सोनाली तु  खूप क्युट दिसत आहेस.' सोनालीने गुढीपाडव्यानिमित्त निळ्या रंगाची पैठणी घातली आहे. 

क्युट आणि ग्लॅमरस अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील तिच्या घरामध्ये .गुढी उभारली आहे. गुढीसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले, 'गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा'. या फोटोमध्ये प्राजक्ताने डार्क पिंक रंगाचा ड्रेस घातला आसून कानात सोनेरी रंगाचे झुबे घातले आहेत. 

मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावर तिने तिचे पती स्वप्नील रावसोबत गुढीची पुजा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी मृण्मयीने चॉकलेटी रंगाची साडी घातली आहे. तर स्वप्नीलने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.  

 
अमृता खानविलकर, जुई गडकरी, प्रिया मराठे, क्षिती जोग, शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, उर्मिला कोठारे या मराठी अभिनेत्रींने देखील त्यांच्या गुढीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.