लंगरच्या सेवेत रंगून गेले 'फुलपाखरू'!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 May 2019

प्रेक्षकांची लाडकी हृता नुकतीच अमृतसरला सहलीला जाऊन आली. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरमध्ये तिने 'लंगर'साठी सेवा दिली.

'फुलपाखरू' मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचं प्रेम प्रेक्षकवर्गाला नेहमीच आकर्षित करतं. म्हणूनच वैदेही आणि मानस, म्हणजेच हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या ऑफस्क्रीन आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता असते. प्रेक्षकांची लाडकी हृता नुकतीच अमृतसरला सहलीला जाऊन आली. कामातून विरंगुळा म्हणून या सहलीला गेलेल्या हृताने एका वेगळ्या पद्धतीने या सहलीचा आनंद लुटला. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरमध्ये तिने 'लंगर'साठी सेवा दिली.

या लंगरच्या रोटी बनवण्यासाठी सेवा देताना हृता मनापासून त्यात रमली होती. हवापालट म्हणून करण्यात आलेली ही सहल सार्थकी लागल्याची भावना हृताने व्यक्त केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress hruta durgule served in langar at Amritsar