शनायाने ठेवला 'हॉट' इन्स्टाग्राम डिपी, पाहा तिचा नवा सेक्सी लुक !

वृत्तसंस्था
Wednesday, 8 January 2020

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्य़ाची बायको' ही लोकांच्या पसंतीत उतरली आहे. टीआरपीच्या आकड्यातही ही मालिका अव्वल आहे. या मालिकेतील पूर्वीची शनाया म्हणजेत रसिकाने अपलोड केले काही हॉट फोटो ! 

मुंबई :चित्रपटांसह मालिकांची लोकप्रियताही सर्वाधिक आहे. त्यामुळे विविध भाषांतील मालिका लोक आर्वजुन पाहतात. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्य़ाची बायको' ही लोकांच्या पसंतीत उतरली आहे. टीआरपीच्या आकड्यातही ही मालिका अव्वल आहे. राधिका, गॅरी आणि शनाया या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या मालिकेतील पूर्वीची शनाया म्हणजेच रसिका सुनिल हिने मालिकेचा निरोप घेतला. पण आजही शनाया म्हणून तिला लोक पसंत करतात. सध्या इशा केसरकर शनायाची भूमिका साकारतेय आणि लोकांनी तिलाही प्रेम दिले. 

रसिका सोशल मीडियावर अॅक्टीव असते आणि इन्साग्रामवर तिची फॅनफोलोइंगही जास्त आहे. अनेकदा लाइव्ह आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधते. नुकताच रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. बिकीनीमधील या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. 

बिकीनीमधील या फोटोतून रसिकाचा हॉट अंदाज समोर आला आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण, अनेकांनी या फोटोवर नाराजीही व्यक्त केलेय. फोटोला साजेसं रसिकाने फोटोला कॅप्शनही दिलं. 

काही दिवसांपूर्वीच रसिका 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातून झळकली. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचा निरोप घेतल्यावर रसिका अमेरिकेत गेली होती. पुढील शिक्षणासाठी तिने ब्रेक घेतला आणि अनेक गोष्टी केल्या. तिथे तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि प्रमाणपत्रही मिळवले. आता ती जगात कुठेही स्कुबा डागविंग करु शकते. तिला फिरण्याचीही आवडही आहे.पुढे ती कोणत्या मालिका किंवा चित्रपटातून दिसणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress Rasika sunil bikini photoshoot