चला दंगल समजून घेऊ; मराठी अभिनेत्रीचं वेबसिरीजमध्ये पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

चित्रपट, मालिकांमधील अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस. 'बकेट लिस्ट' या चित्रपटात माधुरी दिक्षीत सोबत रेशमने स्क्रीन शेअर केली होती.  तसेच बिग बॅास सिजन-1 मधून  रेशमला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

मुंबई - चित्रपट, मालिकांमधील अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस. 'बकेट लिस्ट' या चित्रपटात माधुरी दिक्षीत सोबत रेशमने स्क्रीन शेअर केली होती.  तसेच बिग बॅास सिजन-1 मधून  रेशमला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस नेहमीच सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना काही ना काही अपडेट देत असते. इन्स्टाग्रामवर फोटो शेअक करून ती तिच्या कामाची माहितीसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं असते. यातच सध्या तिच्या वेबसिरिजीच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं तिनं इन्स्टाग्रमावर फोटो शेअर करून सांगितलं आहे. यामध्ये गणपतीची पूजा करताना रेशम टिपणीस आणि सिरीजच्या टीममधील इतर कलाकार मंडळी दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Resham Tipnis (@tuffnut10)

आता मराठी वेब सिरीजमधून रेशम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रेशमने सोशल मिडियावर शूटिंग क्लॅपचा फोटो शेअर करून तिच्या वेब सिरीजची घोषणा केली. ' न्यू बिगीनींग न्यू वेब सिरीज 2021 बाप्पा मोरया' असं कॅप्शन रेशमने या पोस्टला दिले आहे. 

'चला दंगल समजून घेऊ' असं या वेब सिरीजच नाव आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे करणार आहेत. या चित्रपटातील लूक सोशल मिडियावर रेशमने पोस्ट केला आहे.'बाहुबळी' हा आगामी चित्रपटात रेशम दिसणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress resham tipnis web series shooting