'नाही तिला पवार साहेबांच्या पायाशी आणलं तर..' सविता मालपेकर संतापल्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

savita malpekar on ketaki chitale

'नाही तिला पवार साहेबांच्या पायाशी आणलं तर..' सविता मालपेकर संतापल्या..

अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar) या प्रकरणी केतकी चितळेवर आतापर्यंत बारा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या विधानवरून गेली दोन दिवस तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही केतकीचा समाचार घेतला आहे. (savita malpekar)

केतकीने शरद पवार यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली . केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. यात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. केतकीचे ही पोस्ट व्हायरल झाल्याने तिला ती चांगलीच भोवली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सविता मालपेकर (savita malpekar) यांनीही केतकीचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला आहे. “तिची पोस्ट वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर माझा संताप होत आहे. कोण आहे केतकी चितळे. काय लायकी आहे तिची. एक दोन मालिका केल्या, त्यातही धड काम टिकवता आल नाही. हिमालयाएवढ कर्तृत्व असलेल्या माणसाविषयी आपण काय बोलतोय हे कळायला हवं. तुझा बोलविता धनी तर आम्ही शोधून काढूच पण तुझाही समाचार घेऊ.'असं त्या म्हणाल्या. (savita malpekar on ketaki chitale)

पुढे त्या म्हणाल्या, 'मी एक कलाकार म्हणून सांगतेय आणि राष्ट्रवादीची सांस्कृतीक सेलची प्रदेश सरचिटणीस म्हणून मी तिला सांगू इच्छीते याच्यापुढे जर तू असं काही बोललीस आणि जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही. हे लक्षात ठेव.'