Video : 'झिम्मा' ट्रेलरमधील सायली संजीवच्या 'त्या' बोल्ड सीनची चर्चा 

sayali sanjeev
sayali sanjeev

जागतिक महिला दिनानिमित्त 'झिम्मा' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. विविध वयोगटातील आणि विविध पार्श्वभूमी असणाऱ्या सात बायका परदेशी फिरायला जातात आणि त्यादरम्यान काय गमतीजमती होतात, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद तर मिळतोच आहे. पण त्याचसोबत या टीझरमधील एका दृश्याची सोशल मीडियावर विशेष चर्चा होतेय. ही चर्चा आहे अभिनेत्री सायली संजीवच्या बोल्ड दृश्याची. या टीझरमध्ये सायलीच्या भूमिकेची ओळख त्या बोल्ड दृश्यानेच होते. सायलीला याआधी इतक्या बोल्ड अंदाजात कधीच पाहिलं गेलं नाही, त्यामुळे तिच्या भूमिकेविषयी अधिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 

सायलीने आतापर्यंत मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तीनही क्षेत्रांत काम केलंय. झी मराठी वाहिनीवरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली होती. त्यानंतर ती आटपाडी नाइट्स, एबी आणि सीडी, पोलीस लाइन, सातारचा सलमान यांसारख्या चित्रपटात झळकली. सायलीचा सोज्वळ अंदाज नेहमीच चाहत्यांना खूप आवडला. आता तिला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आगामी काळात तिचा 'बस्ता' आणि 'गोष्ट एका पैठणीची' हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

या चित्रपटात निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कलाकारांची फौजच आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या २३ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com