esakal | दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरेचे कमबॅक; 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actress sonali khare comback after 8years on tv show

शो चे वेगळेपण सांगताना सोनाली म्हणते, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामूळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे.

दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरेचे कमबॅक; 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुन्हा आली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.

सोनालीने अगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गंमतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते.आता  सोनालीच्या चाहत्यांना दस-यापासून तिला टेलिव्हिजनवर पून्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परत येत आहे. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमुळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”

शो चे वेगळेपण सांगताना सोनाली म्हणते, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामूळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील. असं मला वाटतं.”

“सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामूळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामूळे सेटवरचं वातावरणं तसंच असतं, ह्याचा मला आनंद आहे.” असे ‘न्यू नॉर्मल’मध्ये शुटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनालीने सांगितले.