Sonali Kulkarni:अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा खास किस्सा,म्हणाली जोपर्यंत लग्नाचे विधी पार पडत नाही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Sonali shared her marriage memories in an interview

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा खास किस्सा,म्हणाली 'जोपर्यंत लग्नाचे विधी पार पडत नाही..'

मराठी चित्रपटसृष्टीतील मराठी गाण्यांवर थिरकणारी आणि पिठलं भाकर खात फिटनेस जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.सोनालीचे नुकतेच कुणाल बेनोडेकरशी परत एकदा लग्न झाले.लॉकडाऊनमुळे विधीवत लग्न या जोडप्याला शक्य झाले नव्हते.त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी परत एकदा थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला होता.एका मुलाखतीत सोनालीने तिच्या लग्नाचा एक खास किस्सा सांगितला.

गेल्या महिन्यात या जोडप्याने लंडनमधे जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले.मात्र सोनाली आणि कुणालच्या या लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडिओज अजूनही समोर आलेले नाहीत."मला सर्व विधींमध्ये विश्वास आहे.(Marathi Actress) सर्व विधींसह लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. जोपर्यंत ते विधी पार पडत नाहीत, तोपर्यंत मला लग्न केल्यासारखं वाटलंच नाही”, असेही ती म्हणाली.

हेही वाचा: Sonalee Kulkarni 'आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

सोनालीच्या लग्नाचा व्हिडिओ लवकरच एका मराठी 'ओटीटी प्लॅटफॉर्मवर' प्रदर्शित होणार आहे.(Marriage)मराठी सिनेसृष्टीत अद्याप कोणी लग्नाचा व्हिडिओ 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवर आणलेला नाही.त्यामुळे सोनाली तिच्या येणाऱ्या लग्नाच्या व्हिडिओसाठी खूप उत्सुक आहे.सोनाली आणि कुणाल लग्नानंतर मॅक्सिकोला हनिमूनसाठी गेले होते.तेथील बरेच फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता.(Instagram) त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते.सोनालीने सासरी पहिल्यांदा केलेल्या पदार्थाचा एक फोटो पोस्ट केला होता.'सासरी केलेला पहिला पदार्थ' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया तिच्या या फोटोला उमटल्या होत्या.

Web Title: Marathi Actress Sonali Kulkarni Shared A Special Momemts Of Her Marriage In An Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top