Tejaswini Pandit: मैत्रिणीची सेटिंग करायला गेली आणि स्वतःचीच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Pandit: मैत्रिणीची सेटिंग करायला गेली आणि स्वतःचीच...

Tejaswini Pandit: मैत्रिणीची सेटिंग करायला गेली आणि स्वतःचीच...

तेजस्विनीचा 'बांबू' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्ताने सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तेजस्विनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहे. बांबू सिनेमाच्या निमित्ताने तेजस्विनीने एका मुलाखतीत तिच्या कॉलेजचा किस्सा सांगितला. यात मैत्रिणीची सेटिंग करायला निघालेल्या तेजस्वीनीचे कसे बांबू लागले याचा किस्सा तिने सांगितला.

(marathi actress tejaswini pandit proposed a boy for her best friend but proposal went wrong)

हेही वाचा: Bigg Boss 16: टीना दत्ताचा पत्ता कट तर कोणाला मिळणार 'टिकिट टू फिनाले'!

तेजस्विनी कॉलेजमध्ये अगदी बिनधास्त होती. तिची एक जवळची मैत्रीण होती. त्या मैत्रिणीला एक मुलगा आवडायचा. मैत्रीण तेजस्विनीला म्हणाली, 'तू जाऊन त्याला सांग की, तो मला आवडतो.' आणि अशाप्रकारे मैत्रीची सेटिंग करायची जबाबदारी तेजस्विनीने घेतली.

हेही वाचा: Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता' पुन्हा आले जुळून, मकरसंक्रांती निमित्त झाल्या गाठीभेटी

तेजस्विनी त्या मुलाला म्हणाली, "अरे ऐक ना ती माझी जी मैत्रीण आहे ना तिला तू खूप आवडतोस. जर तुमच्यात काही झालं तर आम्हाला आनंद होईल." हे सर्व त्या मुलाने शांतपणे ऐकलं. मग तो तेजस्विनीला म्हणाला, "अगं तू मला तिच्याबद्दल सांगायला आलीस पण मला तुझी मैत्रीण नाही तू आवडतेस." हे ऐकताच तेजस्विनी पार उडाली.

तेजस्विनी त्याला म्हणाली, "मी फक्त त्याला एवढंच म्हणाले मी तुला कधी त्या नजरेने पाहिलं नाही. मी माझ्या मैत्रिणीचं प्रपोजल घेऊन त्याच्याकडे गेले होते आणि तोच मला असं म्हणाला." अशाप्रकारे तेजस्विनीने तिच्या कॉलेजचा हा किस्सा सांगितलं.

हेही वाचा: Bamboo Trailer: अभिनयच्या प्रेमाचे बांबू लागणार की...?

आगामी मराठी 'बांबू' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉईज फेम दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी बांबू सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमात अभिनय बेर्डे प्रमुख भूमिकेत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने बांबू सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर धम्माल आणि भन्नाट आहे. २६ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय