आज रपट जायें तो...

आज रपट जायें तो...

सर्व पिढींना आवडणारं हे गाणं म्हणजे अमिताभ-स्मिता पाटील यांचं आज रपट जायें तो.अमिताभ यांनी अनेक चित्रपटात पावसातील गाणी केलीत. मात्र ही मराठमोठी अभिनेत्री स्मिता पाटीलआणि अमिताभ याच्यातील या गाण्यातील केमिस्ट्री रसिकांना खुपच भावली.तो काळ चित्रपटात अभिनेत्रीला पावसात भिजवलच पाहिजे असा आग्रह धरणारा होता. अमिताभ हे लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना त्यांचे बहुतांश सर्वच अभिनेत्रीसमवेत त्याकाळात चित्रपट येत होते, रसिकांनी ते डोक्‍यावर घेतलेत. प्रकाश मेहरा यांचे तर लागोपाठ सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले.यातील कथानक,गाणी,आणि रसिकांना हवा असलेला मनोरंजनाचा खजिना हवाहवासावाटत असे.हा चित्रपट सर्वच बाबतीत सरस होता.गीतकार अंजान यांनी हे गाणं रचलं आणि बप्पी लाहिरी यांनी संगीतबधद केलं.गाण्याचा मुखडा लिहितांना या भाषेतील गोडवा अधिकभावतो. ते शब्द वेगळे पण आपले वाटतात,नंतर पुर्ण गाणं हे रोमॅंटिक जगात घेऊन जातं.किशोर कुमार आणि आशा भोसले यांची गाणी सुपरहिट आहेत. त्या यादीत हे गाणं आघाडीवर कायम राहील एवढं टवटवीत आणि ताजतवानं आहे. काळ कितीही बदलला तरी पाऊस आला की हे गाणं चिंब करतं,भिजायला भाग पाडतं,आपल्याला रोमॅंटिक जगात नेतं. 

आज रपट जायें तो हमें ना उठइयो 
आज फिसल जायें तो हमें ना उठइयो 
हमें जो उठइयो तो ख़ुद भी रपट जइयो 
हॉं ख़ुद भी फिसल जइयो 

या चार ओळी बप्पीदांनी या दोन गुणी गायकांकडून इतक्‍या खुबीने गाऊन घेतल्या की ते गाणं पुर्ण ऐकल्याशिवाय मग राहवत नाही.त्यात नक्कीच हवाहवासा रोमान्स आहे हे संकेत मिळतात.संगीत संयोजनात नेहमीच वेगळा आणि आधुनिक प्रयोग करण्यात माहिर असलेल्या बप्पीदांनी या गाण्याला तालबद्ध ठेक्‍यातून चार चॉंद लावलेत.आशा भोसले यांनी अनेक गाणयात अह्हा,ओह्हो हे शब्द अनेकदा उच्चारलेत, पण याची सर न्यारीच,जणू रोमॅंटिक पावसाची सरच.इतकं त्यात अदभूत लावण्य आहे,सौंदर्य आहे. केवळ अह्हा वर आशाताईनी दिलेला जोर म्हणजे तुमच्यातील रसिकत्वाला दिलेलं प्रोत्साहनच म्हणायला हवं.गीतकार अंजान यांनी शब्दा-शब्दात रोमांस भरून या गीताची लज्जत वाढविली आणि हा रोमांस मग हे दोन गायक आणि बप्पीदांच्याथिरकायला लावणाऱ्या संगीतामुळे उत्तरोत्तर वाढत जातो.गिटार,बासरी,ढोलक आणि ड्रम यांचा सुरेल उपयोग या चालीत भावतो.किशोरदांनी 
रपट या शब्दांवर दिलेला विशिष्ट जोर आणि आशाजींची तितकीच सुरेल साथ यामुळे हे गाणं ताल धरायला भाग पाडतं. 

बरसात में थी कहॉं बात ऐसी 
पहली बार बरसी बरसात ऐसी 
कैसी ये हवा चली, पानी में आग लगी 
जाने क्‍या प्यास जगी रे 
भीगा ये तेरा बदन, जगाये मीठी चुबन 
नशे में झूमें ये मन रे 
कहॉं हूँ मैं, मुझे भी ये होश नहीं आए 
आज बहक जायें तो होश न दिलइयो 
होश जो दिलइयो तो ख़ुद भी बहक जइयो 

या पूर्ण कडव्यात बप्पीदांनी ढोलक,ड्रमचा उपयोग केला अन्य वाद्यमेळ नसल्याने आशा-किशोर यांच्या आवाजाची जादू मोहित करते.प्रत्येक कडव्यात ठासून रोमांस भरला आहे लपट, सिमट हे शब्द असाच रोमांच उभा करणारे. 


साडीचा पदर आणि तिला अलगद जवळ खेचणं 
या गीताच्या सुरवातीला जेव्हा ठेका सुरू होतो तेव्हा, चित्रीकरणात प्रकाश मेहरा यांनी कमाल केली सहसा पावसात भिजणारी अभिनेत्री प्रियकराला बिलगलेली सर्वांना आवडते,पण या गाण्यात गम्मत ही आहे की,अमितजीजवळून दूर जाणाऱ्या स्मिता पाटील यांच्या साडीचा पदर त्यांच्या जॅकेटच्या हुकमध्ये अडकतो आणि मग आपल्या प्रेयसीला अगदी हळूहळू जवळ ओढतानाची जी नजाकत या गाण्यात पेश झाली त्याला तोड नाही,म्हणूनच पाऊस पडला की, हे गाणं बघितलंच,ऐकलंच पाहिजे. 

मेलडी मेकर्स: 
-अह्हा,ओह्हो ची आशा भोसलेंची सर न्यारीच 
-गिटार,बासरी,ढोलक आणि ड्रमचा सुरेल उपयोग 
-अंजान यांनी भरला शब्दा-शब्दात रोमांस 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com