Marathi Bigg Boss : 'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 May 2019

लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.

मुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. 

पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण कंटेस्टंट असतील याबाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता होती. यावर अनेक अंदाज बांधले गेले. आज या उत्सकतेला पूर्णविराम मिळाला आणि 15 दिग्गज आज बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट म्हणून आले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रातीलच नाही तर विविध क्षेत्रातील लोक यावेळी बिग बॉसमध्ये बघायला मिळतील.

या सीझनमधील महत्वाची नावं म्हणजे, अभिनेत्रीे किशोरी शहाणे, लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायिका वैशाली माडे, अभिनेते विद्याधर जोशी! याशिवाय शेफ पराग कान्हेरे, अभिनेत्री मैथिली जावकर, अभिनेता अभिजीत केळकर, मालिका व चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहा शितोळे, अभिनेता दिगंबर नाईक, मालिकांमधील नायिका शिवानी सुर्वे, अभिनेत्री वीणा जगताप, अभिनेत्री रुपाली भोसले, अभिनेता माधव देवचक्क हे ही या सीझनमध्ये दिसतील.

साताऱ्यातील कवी अभिजीत बिचुकले, एमटीव्ही रोडीजमधील शीव ठाकरे हे ही बिग बॉस सीझन 2 मध्ये चमकतील. आता पुढचे 100 दिवस हे 15 अतरंगी या घरात काय धमाल करतात हे बघणेच औत्सुक्याचे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Bigg Boss Actor and Actress colors channel