esakal | मराठी पाऊल पडते पुढे; 'कानभट्ट' ची बाजी,15 पुरस्कारांवर कोरलं नाव
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi cinema kanbhatt wins 15 awards at national international film festival

या चित्रपटानं अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे; 'कानभट्ट' ची बाजी,15 पुरस्कारांवर कोरलं नाव

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - लॉकडाऊनच्या वेळी मनोरंजन क्षेत्रावर अरिष्ट कोसळले होते. कोरोनाच्या वाढलेल्या संकटामुळे वेगळी परिस्थिती ओढावली होती. आता त्यात थोडाफार फरक पडला आहे. सध्या एका मराठी चित्रपटाचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्या चित्रपटाचे नाव म्हणजे 'कानभट्ट'. या चित्रपटानं अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. आतापर्यत या चित्रपटाच्या नावावर 15 पुरस्कार जमा झाले आहेत.

विविध सिने महोत्सवांमध्ये अभिनयापासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने न्याहाळत मूल्यमापन करणाऱ्या देश-विदेशातील परीक्षकांनी 'कानभट्ट'च्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. भव्य शिंदे आणि ऋग्वेद मुळे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कानभट्ट'ने आतापर्यंत 15 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार आपल्या नावे करत सिनेमाच्या टीमला मिळालेले यश साजरे करण्याची एक संधी दिली आहे. साऊथ फिल्म अँड आर्टस अ‍ॅकॅडमी चिले (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), लॅकेसिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिका), अयोध्या फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), व्हाईट युनिकॅार्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट),

न्यू जर्सी इंडियन अँड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), दृक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), आठवा नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट लेखक), व्हर्जिन स्प्रिंग्ज सिनेफेस्ट (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट), अॅकोलेड ग्लोबल फिल्म कॅाम्पिटीशन (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) आणि पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) या सिने महोत्सवांमध्ये कानभट्टला यश मिळाले आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा एस. होशिंग यांनी केले असून तो 19 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.  अपर्णा यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. 

करिनाची 'ड्यु डेट' जाहीर, तैमुरला भाऊ मिळणार की बहीण; चर्चा तर होणारच

या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.  ट्रेलर पाहिल्यानंतर परीक्षकही सिनेमाच्या टीमला प्रेरणा देत आहेत.या सिनेमाची कथा ऋग्वेद मुळे या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिक अपर्णा म्हणाल्या, मराठी सिनेसृष्टीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.  याचा फायदा मराठी सिनेमांना होत आहे. मराठी सिनेमांच्या कंटेंटसोबतच कलाकारांच्या अभिनयाकडेही आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाने पाहिले जात आहे. मी नेहमीच सिनेमाचा विषय आणि आशयाला प्राधान्यक्रम दिला आहे. आता माझ्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला असून, प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे हे यानिमित्तानं सांगावेसे वा़टते.