Video : पाहा केदार शिंदेंचा 'लॉकडाउन लग्नसोहळा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar Shinde

Video : पाहा केदार शिंदेंचा 'लॉकडाउन लग्नसोहळा'

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेने Kedar Shinde लॉकडाउनमध्ये दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घरच्या घरीच छोटेखानी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (marathi director kedar shinde posted his lockdown wedding video)

काय म्हणाला केदार शिंदे?

'हा खूप खास व्हिडिओ आहे. आमच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. २५ वर्षांपूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी कोणतेही विधी झाले नाहीत. २५ वर्षांनंतर आमची मुलगी सना हीने शास्त्रशुद्ध लग्न करायचं ठरवलं. पण लॉकडाउनमुळे काही शक्य नव्हतं. आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, प्रशांत गावकर, रंजित गावकर, सोहम बांदेकर यांच्या मदतीने सनाने पूर्ण तयारी केली. ९ मे रोजी हा घरगुती समारंभ पार पडला. ९ मे १९९६ रोजी ७५०/- रुपयांत लग्न केलं. २५ वर्षांनंतर आत्ताचं लग्नसुद्धा लॉकडाउनमुळे फारच आटोक्यात पार पडलंय. या दिवसात खरंच काही परवडत नाही. पण आयुष्यात सकारात्मक राहायचं असेल तर काही तरी करायलाच हवं. आपल्या शुभेच्छा, आशिर्वाद सतत सोबत राहू द्या,' असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलंय.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीचा पती आहे तरी कोण?

केदारच्या या लग्नसमारंभाला काही मराठी आणि हिंदी कलाकारांनी व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थिती लावली. बेला आणि केदार शिंदे यांनी पळून लग्न केल्याने त्यांच्या पहिल्या लग्नामध्ये कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता आणि या लग्नात लॉकडाउनमुळे बेलाचे आई वडिल येऊ शकले नव्हते. त्यामुळे या अनोख्या लग्न सोहळ्यामध्ये सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी कन्यादान केले.

loading image
go to top