Viral Video : बीटीएस आर्मीला लागली उचकी ! द. कोरियामध्ये घुमतोय लावणीचा आवाज

कोरियन युवतींनी त्या लावणीवर केलेला डान्स हा आता सगळीकडे कौतुकाचा विषय ठरतो आहे.
Marathi Lavani perfomed by south korean artist
Marathi Lavani perfomed by south korean artist esakal

Marathi Lavani perfomed by south korean artist : बीटीएस हा शब्द तरुणाईला विशेष प्रिय आहे. त्या ग्रुपची गाणी, त्यांचे व्हिडिओ, फोटो हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय असणाऱ्या बीएटीसची लोकप्रियता साऱ्या जगात आहे. भारतातही त्यांचा चाहतावर्ग प्रचंड आहे. केवळ तरुणाई नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही बीटीएसची भुरळ पडल्याचे दिसून येते.

आता इंस्टावर जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानं अनेकांनी पसंती मिळवली आहे. मराठमोळी सेलिब्रेटी आदिती भागवतनं तो व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील त्या लावणीनं आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. मला लागली कुणाची उचकी या लावणीवर चक्क कोरियन युवतींनी केलेलं नृत्य कौतुकाचा विषय आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी असणाऱ्या सेऊलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये रंगलेल्या त्या लावणीचं मोठं कौतुक होताना दिसत आहे. कोरियन युवतींना लावणीवर नाचताना पाहून नेटकरीही अवाक् झाले आहे. आदिती भागवतनं या लावणीची कोरिओग्राफी केली असून रास डान्स कंपनीनं ती सादर केली आहे. तो परफॉर्मन्स पाहिल्यानंतर उपस्थितांनी त्याला मोठी दाद दिली आहे.

Marathi Lavani perfomed by south korean artist
Shreyas Talpade Health Update: कशी आहे श्रेयसची तब्येत, डॉक्टरांनी काय सांगितले?

यापूर्वी देखील परदेशामध्ये विविध कलाकारांनी लावणी सादर करुन नेटकऱ्यांचे, प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. पण कोरियन कलाकारांनी लावणी सादर करत एक आगळी वेगळी ट्रीट चाहत्यांना दिली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, याला म्हणतात लावणी...किती सुंदर नृत्य केलं आहे कोरियन युवतींनी...त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसऱ्यानं म्हटलं आहे की, महाराष्ट्राची लाडकी लावणी जेव्हा कोरियामध्ये सुद्धा तितक्याच प्रभावीपणे सादर होते हे पाहताना भारी वाटते. सगळ्या कलाकारांचे खूप खूप कौतुक....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com