'हिरकणी'नंतर प्रसाद ओक पुन्हा सज्ज; 'चंद्रमुखी'चे पोस्टर रिलीज

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव पुन्हा पाहिलं जाणार मोठ्या पडद्याच्या माध्यमातून...

तो ध्येयधुरंधर राजकारणी

ती तमाशातली शुक्राची चांदणी

लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची 

ही राजकीय रशीली कहाणी...!!!

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. 

मृण्मयी देशपांडेचे दिग्दर्शनात पदार्पण; 'मन फकीरा'चे मोशन पोस्टर लॉन्च

या सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘AB आणि CD’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या दोन सिनेमांच्या निर्मितीनंतर ‘चंद्रमुखी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. अक्षय यांच्या पहिल्या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे तर दुस-या सिनेमात सायली संजीवच्या भूमिकेतून पैठणीसाडी भोवती एक सुंदर गोष्ट मांडली आहे आणि आता कादंबरीवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

तो ध्येयधुरंधर राजकारणी ती तमाशातली शुक्राची चांदणी लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली कहाणी...!!! विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित संगीतकार अजय-अतुल या जोडीसोबत प्रथमच माझं नवं दिग्दर्शकीय पाऊल...!!! लवकरच...!!! @akshaybardapurkar @chinmay_d_mandlekar @planet.marathi @goldenratiofilmsg @ajayatulofficial @sanjaymemane @manjiri_oak #vishwaspatil #chandramukhi #planetmarathi #prasadoak #akshaybardapurkar #चंद्रमुखी

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसिध्द लेखकाच्या प्रसिध्द लेखणीवर जेव्हा सिनेमा तयार केला जातो तेव्हा त्या सिनेमाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन कोण करणार हा सहजपणे मनात येणारा प्रश्न असतो. कारण कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. आणि या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषेतील सिनेमांना एका पेक्षा एक अफलातून गाणी ज्यांनी दिली, ज्यांच्या गाण्यांना नेहमीच ‘वन्स मोअर’ मिळत आला आहे आणि विशेष म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिध्दी मिळवणा-या १०० सेलिब्रिटींची यादी असणा-या ‘फोर्ब्स’ मध्ये स्थान मिळवणारे ‘अजय-अतुल’ ‘चंद्रमुखी’ची संगीतकार जोडी असणार आहे. 

#WhatsInYourDabba बॉलिवूडकर विचारताहेत, 'तुमच्या डब्यात काय?'

तसेच छायाचित्रण संजय मेमाणे यांचं आहे.  पुन्हा एकदा प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर आणि संजय मेमाणे पडद्यावर काय जादू करतात पाहूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Chandramukhi poster released