esakal | परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारा 'पेन्शन'; सोनाली वेगळ्या भूमिकेत
sakal

बोलून बातमी शोधा

marathi movie pension official trailer out sonali kulkarni

सेवानिवृत्त झलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना पेन्शन दिली जाते. त्या पेन्शनचा वापर ते वृध्दापकाळातील लागणाऱ्या वस्तू किंवा औषध घेण्यासाठी करत असतात. पण या पेन्शनसाठी त्या वृद्ध व्यक्तीचे मरणं थांबवले तर?

परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारा 'पेन्शन'; सोनाली वेगळ्या भूमिकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभियाने  नेहमीच प्रेक्षकाचे मन जिंकते. तिच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे, गुलाबजाम, डॉ. काशिनाथ घाणेकर, देऊळ या चित्रपटांमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. नुकताच तिचा पेन्शन या चित्रपटाची ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपाटात सोनाली सोबत सुमीत गुट्टे हा बालकलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सेवानिवृत्त झलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना पेन्शन दिली जाते. त्या पेन्शनचा वापर ते वृध्दापकाळातील लागणाऱ्या वस्तू किंवा औषध घेण्यासाठी करत असतात. पण या पेन्शनसाठी त्या वृद्ध व्यक्तीचे मरणं थांबवले तर? अशीच धक्कादायक कथा 'पेन्शन' या नव्या मराठी चित्रपटात दाखवली गेली आहे. अनेक वेळा परिस्थितीमुळे माणूस संकटात सापडतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील अडचणी, घरातील वृद्ध व्यक्तीची देखभाल या सगळ्यामध्ये अडकलेल्या महिलेची व्यधा या चित्रपटात मांडली आहे.  या चित्रपटातील संवाद हे अतिशय संवेदनशील आहेत असे ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ  यांनी केले आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना सोनाली म्हणाली, “पेन्शन ही आयुष्याबद्दलची एक मार्मिक कथा आहे. प्रत्येक सीन विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. ही एक भावस्पर्शी कहाणी आहे जी आपल्याला साधेपणा आणि निरागसतेचे मूल्य प्रभावीपणे सांगते.'' ''मी सर्वात अर्थपूर्ण प्रकल्पांपैकी एकाचा भाग आहे, हे मी माझे भाग्य समजते,”असेही सोनालीने यावेळी सांगितले. 

इंद्र नावाच्या मुलाचे त्याच्या आई आणि आजी सोबतचे नाते या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटाची निर्मिती 'इरॅास नाऊ'ने केले आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला रिलीज होणार असून या चित्रपटाचा ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे