Raavrambha movie: "निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते!" ‘रावरंभा’चे पोस्टर प्रदर्शित!

Raavrambha movie
Raavrambha movieEsakal

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा धडाकाच सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित अनेक चित्रपट आता आले आहेत . हर हर महादेव, वीर दौडले सात यांसारख्या चित्रपटांमूळे वादही निर्माण झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एका ऐतिहासिक चित्रपटांचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘रावरंभा'

'रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे?,कोण कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ "निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते" अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसतायेत. शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.

या पोस्टरवरून ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक कलाकृती पहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Raavrambha movie
Ved movie song: वेड तुझं.... रितेश-जिया शंकरचा बोल्ड अंदाज करेल घायाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com