जेनेलियाचं अस्खलित मराठी अन् कधी कुणाचीही नसावी अशी लव्ह स्टोरी,'वेड'चा ट्रेलर मनाला भिडला..Ved Movie Trailer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Movie: Ved Trailer Release,Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Starer

Ved Trailer: जेनेलियाचं अस्खलित मराठी अन् कधी कुणाचीही नसावी अशी लव्ह स्टोरी,'वेड'चा ट्रेलर मनाला भिडला..

Ved Movie Trailer: रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा या रिअल लाइफ कपलचे असंख्य चाहते आहेत. अर्थात त्यामुळेच अनेक वर्षांनी हे दोघे एकत्र सिनेमा करत आहेत तर चाहत्यांमध्ये भलतीच उत्सुकता पहायला मिळत आहे. रितेश देशमुख 'वेड' या सिनेमाच्या माध्यमातून केवळ अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शकाच्या भूमिकेतही आपल्याला दिसणार आहे.

तर जेनेलिया पहिल्यांदा मराठी सिनेमात काम करत आहे. शिवाय सिनेमात तिनं डबिंग आर्टीस्ट वापरला नसल्यानं तिचं मराठी किती स्पष्ट असेल याविषयी देखील उत्सुकता होती लोकांमध्ये. आज 'वेड' चा ट्रेलर रिलीज झाला अन् फटक्यात लोकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. (Marathi Movie: Ved Trailer Release,Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Starer)

हेही वाचा: Aishwarya Narkar video: वयाच्या पन्नाशीत कशी राहते ऐश्वर्या नारकर इतकी फिट?, व्हिडीओतून ओपन केलं सीक्रेट

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' हा मराठी सिनेमा येत्या ३० डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमातील दोन रोमॅंटिक गाणी याआधीच रिलीज झाली आहेत अन् सर्वात अधिक ट्रेन्डिंगलाही आहेत. अजय-अतुलने पुन्हा आपल्या संगीतातून लोकांना मंत्रमुग्ध केल्याचं दिसून आलं. सिनेमात दोन अभिनेत्री आणि एक हिरो असा प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळणार असल्यानं उत्कंठा होतीच. पण समोर आलेल्या ट्रेलरनं ही उत्कंठा अधिक वाढवली.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सिनेमाच्या ट्रेलर मध्ये जेनेलियाचं अस्खलित मराठी पहिल्या फ्रेमपासून मन जिंकून गेलं. सिनेमात जेनेलिया अन् रितेशमधील एकतर्फी प्रेम,त्यातनं संसाराचा संघर्ष,नात्याची होणारी घुसमट, भावनांची घालमेल सारं दोघांनी आपल्या संवादफेकीतून अन् हावभावातून उत्तम दाखवलं आहे. आता ३० सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यावर दोन-अडीच तासाच्या सिनेमाची चाहते वाट पाहू लागलेयत.