Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर! पुरुषोत्तम बेर्डे करणार..

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे सुमी आणि आम्ही नाटक लवकरच रंगभूमीवर
Marathi Natak sumi ani amhi comming soon direct by purushottam berde cast savita malpekar and mohan joshi
Marathi Natak sumi ani amhi comming soon direct by purushottam berde cast savita malpekar and mohan joshisakal

लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे.

कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे सुमी आणि आम्ही हे नवं नाटकं रंगभूमीवर येतंय.

विशेष म्हणजे या नाटकाद्वारे तब्ब्ल ९ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करतायेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारी ही तेच सांभाळणार आहेत.

(Marathi Natak sumi ani amhi comming soon direct by purushottam berde cast savita malpekar and mohan joshi)

Marathi Natak sumi ani amhi comming soon direct by purushottam berde cast savita malpekar and mohan joshi
Sharad Ponkshe: अजूनही काँगेसला सावरकरांची भीती.. शेंबडं पोरगं म्हणत राहुल गांधींवर पोंक्षेंची टीका..

राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक एप्रिलच्या मध्यावर रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत.

राजन मोहाडीकर लिखित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.

एका कुटुंबाची कथा सांगणार हे नाटक आहे. आपल्या मुलीचं सुमीचं मिशन पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आई वडिलांची गोष्ट यात सांगितली आहे.

या नाटकाच्या दिग्दर्शना विषयी बोलताना पुरुषोत्तम बेर्डे सांगतात की, 'माझं अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. त्या व्यापात नाट्य दिग्दर्शनासाठी वेळ मिळत नव्हता. राजन मोहाडीकर यांच्या सोबत मी आधी काम केलं होतं.'

'माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली आणि या नाटकाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. ही संधी घेत हे नाटक मी करायला घेतलं. बर्‍याच वेगवेगळया माध्यमातून मी नव्या कलाकृती रसिकांसाठी आणणार आहे. सुमी आणि आम्ही ही त्यातील एक कलाकृती असून पारंपरिक बाज असलेलं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com