"राजा' चित्रपटाच्या आठवणीत रमली माधूरी दिक्षीत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

माधुरी दिक्षीतच्या "राजा' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून अशोक ठाकरेया निर्मित आहेत.

मुंबई ः माधुरी दिक्षीतचा बॉक्‍स ऑफिसवर पन्नास आठवडे तुफान चाललेला चित्रपट "राजा'ला आज 25 वर्ष पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या आठवणी माधुरीने आज सेटवरील फोटो सोशल मिडीयावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे. माधुरी दीक्षितच्या 

माधुरी दिक्षीतच्या "राजा' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून अशोक ठाकरेया निर्मित आहेत. या चित्रपटाबाबत माधुरीने ट्विट केले आहे की, "राजा चित्रपटाची 25 वर्षे साजरी करत आहोत. त्यातून बऱ्याच आठवणी परत जाग्या झाल्या. मला हा चित्रपट दिल्याबद्दल इंद्र कुमार यांचे आभार. यात संजय कपूरसुद्धा माज्यासोबत होते त्यासाठी सुद्धा आभार. तसेच हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीमचे आभार माधुरीने मानले. 

इंन्स्टाग्रामवर "अखिया मिलाऊ कभी' गाण्याचा फोटो शेअर 
"माधुरीने संजय कपूरसोबत 'अखियान मिलाऊं कभी' हिट डान्स नंबरचा फोटो शेअर केला आहे. मुख्य पाहुणे म्हणून अजय देवगण यांच्यासमवेत त्यांनी सुवर्ण महोत्सवी उत्सवांचे छायाचित्रही शेअर केले. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 

माधुरीने गायले गाणे 
माधुरी सिनेश्रुष्टीची प्रसिध्द व गुणी अभिनेत्री असून आता नवीन कला समोर आली आहे. माधुरीने नुकतेच ''कॅंडल'' नावाचे गाणे गायले असून यात माधुरीचा आवाज ऐकून सर्वच आश्‍चर्य चकित होतील. हे गाणे शेअर करताना माधुरीने लिहिले की, 'मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. हे माझे पहिलेच गाणे असल्यामुळे थोडी नर्व्हस आहे. पण हे गाणे तयार करतांना मिळालेला आनंद मला झाला तितकाच आनंद तुम्हाला पण होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai Actress Madhuri Dixit Playing in the memories of the movie "Raja"