नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया का संतापली !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मी स्वतः:साठी लढायला आणि बोलायला शिकत आहे. मी माझ्या मुलांसाठी खंबीर होत आहे आणि मला नाही वाटत यात माझं काही चुकतयं. सध्या मला कशाचीच चिंता नाहीये.

मुंबई ः चित्रपट सृष्टी तसेच कौटुंबिक जीवनातही अभिनेता आणि अभिनेत्री यांचे वाद-विवाद नेहमी सुरू असतात. काही छोट्या-मोठ्या कारणावरून सुरू झालेले हे वाद कोणत्या वळणावर घेऊन जातील हे आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही. 

त्यातीलच एक अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत येत आहे. आलियाने इमेलद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे. 10 वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर वैवाहिक जीवनातील चढाओढींमुळे तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर सध्या नवाजुद्दीन आणि आलियाचीच चर्चा 
सुरु असून आलियाने नुकतंच ट्विटरवर पदार्पण केलं आहे. सत्य कधी लपत नाही आणि सत्याला विकतही घेता येत नाही, असं तिने ट्विट केलं आहे. काही दिवसापूर्वीच आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर काही गंभीर आरोप केले होते. नवाजुद्दीनच्या कुटुंबीयांनी मानसिक त्रास व शारीरिक शोषण केल्याचं तिने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक नवनवीन चर्चा रंगल्या आहेत. मात्र अनेकांनी तिच्यावरही टिका केले आहे. 

सत्य हे कायम सत्य असते... 
"मी आलिया सिद्दीकी आहे. माझ्याविषयी कोणी गैरसमज करुन घेऊ नये. यासाठी नाईलाजास्तोवर मला ट्विटरवर येऊन सत्य सांगावे लागत आहे. सत्य हे कायम सत्य असतं. ते कधी विकतही घेता येऊ शकत नाही आणि बदलता देखील येत नाही. असं ट्विट आलियाने केलं आहे. पुढे ती म्हणते, "सगळ्यात प्रथम मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी कोणत्याही परपुरुषासोबत रिलेशनशीपमध्ये नाही. काही प्रसारमाध्यमे माझ्याविषयी केलेले दावे ते सारे खोटे आहेत. उगाचचं लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचं मला वाटत आहे. मी स्वतः:साठी लढायला आणि बोलायला शिकत आहे. मी माझ्या मुलांसाठी खंबीर होत आहे आणि मला नाही वाटत यात माझं काही चुकतयं. सध्या मला कशाचीच चिंता नाहीये. त्यामुळे कोणी जर माझ्या चारित्र्यावर संशय घेत असेल किंवा माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत असेल तर मी कधीच ते सहन करणार नाही. पैशामुळे सत्य विकत घेता येत नाही. 

दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या संसाराला 10 वर्ष झाली असून त्यांना दोन मुले आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठविल्यावर अद्याप नवाजुद्दीनने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लॉकडाउन असल्यामुळे इमेल आणि व्हॉट्‌स ऍपद्वारे नोटीस पाठवल्याचे आलियाच्या वकिलांनी सांगितलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai Alia Siddiqui, wife of actor Nawazuddin Siddiqui Family disputes