esakal | बाबो! 'शितली'च्या काकीचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल थक्क! 
sakal

बोलून बातमी शोधा

manjusha khetri

नव्या मालिकेतील जुने चेहरे सोशल मीडियावर चर्चेत

बाबो! 'शितली'च्या काकीचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल थक्क! 

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सध्या मराठी मालिकाविश्वात बऱ्याच नव्या मालिकांची भर झाली आहे. या नव्या मालिकांमध्ये अनेक जुने चेहरे प्रेक्षकांना नव्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. त्यातच चर्चा आहे 'पाहिले न मी तुला' या नव्या मालिकेची. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारतोय. यातल्या आणखी एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मालिकेत नीलमची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंजुषा खेत्री एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. मंजुषाने 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत शीतलीच्या काकीची भूमिका साकारली होती. 

कलाकार मालिकेतील असो किंवा मग चित्रपटातील, प्रेक्षकांची मनं जिंकली असतील तर त्या कलाकाराचा सोशल मीडिया प्रोफाइल चाहत्यांकडून नक्कीच फॉलो केला जातो. याचमुळे सध्या मंजुषाच्या फॉलोअर्सची संख्या वाढत असून तिचे सोशल मीडियावरील विविध फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. यातील काही फोटोंमधील तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना, नेटकऱ्यांना भावला आहे. 

हेही वाचा : 'सासरे फक्त म्हणायला, तो मला बाबापेक्षाही जवळचा'; श्रीकांत मोघेंसाठी प्रिया मराठेची भावूक पोस्ट

मंजुषाने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेत करिअरची सुरुवात केली. त्यातूनच पुढे येत तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मंजुषाचा जन्म रत्नागिरीत झाला असून गेल्या दहा वर्षांपासून ती कोल्हापुरात राहत आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील नीलमच्या भूमिकेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

शशांक केतकरच्या भूमिकेची चर्चा
या मालिकेत अभिनेता शशांक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत असून त्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत. 

loading image