शितली आणि अज्या पुन्हा एकत्र; पाहा VIDEO

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

एका मराठी गाण्यात शिवानी आणि नितीश एकत्र दिसणार आहेत. लागीर झालं जी मध्ये दिसेलेली ही जोडी या गाण्यात रोमान्स करताना दिसत आहे.
 

पुणे - लागिर झालं जी या झी मराठी मालिकेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. या मालिकेतून शितली आणि आज्याच्या जोडीला प्रेक्षकांकाची विशेष पसंती मिळाली होती. ही मालिका संपल्यानंतर पुन्हा या जोडीची वाट प्रेक्षक पाहत होते. शितलीची भूमिका शिवानी बोरकरने तर आज्याची भूमिका नितीश चव्हाण याने केली होती. आता दोघे पुन्हा एकदा एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

एका मराठी गाण्यात शिवानी आणि नितीश एकत्र दिसणार आहेत. लागीर झालं जी मध्ये दिसेलेली ही जोडी या गाण्यात रोमान्स करताना दिसत आहे.

पुष्पक परदेशी यांचे गायन असलेल्या 'लाजताना' गाण्याचे दिग्दर्सन सुशील वाघमारे यांनी केलं आहे.

लागीर झालं जी नंतर पहिल्यांदाच शितली आणि आज्या प्रेक्षकांना या गाण्यामुळे एकत्र दिसले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi shitali ajya shivani borkar nitish chavan new video song

Tags
टॉपिकस
Topic Tags: