esakal | या मराठी तारकांच्या घरी आले बाप्पा, पाहा फोटो!
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi celebes welcomed bappa see photos

एकीकडे सर्वसामान्य लोक आपल्या घरातल्या बाप्पांचे फोटो अपलोड करत आहेत, तर दुसरीकडे मराठी सेलिब्रिटीही त्यांच्या बाप्पांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

या मराठी तारकांच्या घरी आले बाप्पा, पाहा फोटो!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रत्येक घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडेच गणपती आगमनाची उत्सुकता आणि जल्लोष पाहायला मिळतोय.

एकीकडे सर्वसामान्य लोक आपल्या घरातल्या बाप्पांचे फोटो अपलोड करत आहेत, तर दुसरीकडे मराठी सेलिब्रिटीही त्यांच्या बाप्पांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

एकूणच काय तर आज सोशल मीडियावर धूम आहे ती सेलिब्रिटींच्या घरातील बाप्पांच्या फोटोंची. या मंडळींनी गणपती बाप्पाचे फोटो शेअर करत लोकांना जागृत करण्याचं कामही केलं आहे. काहींनी स्वत: घरी गणपतीची मूर्ती  साकारली आहे, तर काहींनी इकोफ्रेंडली बाप्पा आणि त्याविषयी संदेशही दिला आहे. मराठमोळ्या सेलिब्रिटींनी शेअर केलेले बाप्पांचे फोटो तुम्ही पाहाच.

सुबोध भावे याने दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन केलं आहे. त्याने इन्टाग्राम पेजवर बाप्पासोबतचा सेल्फी अपलोड केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे यावेळी त्याने चक्क पुणे मेट्रोचा देखावा साकारला आहे. शिवाय निसर्गाचं रक्षण करण्याचा संदेश कॅप्शनमधून दिला आहे.

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी संवेदनशील आणि परखड मतांसाठी ओळखली जाते. काहीतरी वेगळं करत ती नेहमीच लोकांना जागृत करण्याचं काम करते. स्पृहाच्या गावी दरवर्षी गणपतींचं आगमन होतं. मात्र, यावर्षी तिने तिच्या घरीच इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या इकोफ्रेंडली गणपतीच्या मूर्तीमध्ये रोपट्याचं बीजरोपण केले आहे. विसर्जनानंतर मूर्तीच्या मांगल्यातून काही दिवसांनी एक रोप उगवून येईल. या गणपतीच्या पूजेचा व्हिडिओ तिने ट्विटरवर अपलोड केला आहे.

अभिनेता राकेश बापट याने बाप्पाच्या आगमनाचा सुंदर फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. राकेश दरवर्षी स्वत: गणपतीची मूर्ती साकारतो.

अभिनेत्री सायली संजीवनेही तिच्या बाप्पाचे फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. विटांच्या साहाय्याने वेगळ्या पद्धतीने तिने बाप्पाची बैठक केली आहे. 

अभिनेता अभिजीत खांडेकर यानेही गणपती आगमनाचे आणि कुटुंबासमवेत टिपलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. बायको सुखदा खांडेकर सोबतच्या फोटोला चाहत्यांकडून खूप पसंत केलं जात आहे.

loading image
go to top