समांतर वेबसिरीज : एकाचा भूतकाळ; तर दुसऱ्याचं भविष्य!

टीम ई सकाळ
Friday, 13 March 2020

'समांतर'चे नुकतेच ट्रेलर लॉन्च झाले. या वेबसिरीजमध्ये स्वप्निल कुमार महाजन नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. गूढ, रहस्यमयी अशी ही व्यक्तिरेखा आहे. तो संपूर्ण कथानकात कोणाच्या तरी शोधात आहे. सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तिसोबत घडलेल्या घटना आणि त्याचं नशीब हे तंतोतंत कुमार सोबत घडतं.

सध्या सगळ्यांनाच वेबसिरीजचं वेड लागलंय. टिव्ही कमी आणि स्मार्टफोनवर वेबसिरीज बघण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. चांगला विषय, उत्तम स्टारकास्ट सादर करत वेबसिरीज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर निर्माते भर देताना दिसतात. अशाच प्रकारे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन एक हिंदी वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर सज्ज आहे. 'समांतर' असं या वेबसिरीजचं नाव असून अभिनेता स्वप्निल जोशी या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असेल. प्रेक्षकांसाठी खूशखबर म्हणजे या वेबसिरीजचं दिग्दर्शन आपल्या सर्वांचा लाडका दिग्दर्शक सतीश राजवाडे करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'समांतर'चे नुकतेच ट्रेलर लॉन्च झाले. या वेबसिरीजमध्ये स्वप्निल कुमार महाजन नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. गूढ, रहस्यमयी अशी ही व्यक्तिरेखा आहे. तो संपूर्ण कथानकात कोणाच्या तरी शोधात आहे. सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तिसोबत घडलेल्या घटना आणि त्याचं नशीब हे तंतोतंत कुमार सोबत घडतं. त्यामुळे कुमार सुदर्शनच्या शोधात बाहेर पडतो. त्याला अशा काही गोष्टी कळतात, ज्याने तो चक्रावून जातो. एका व्यक्तिचा भूतकाळ आणि दुसऱ्या व्यक्तिचा भविष्यकाळ अशी ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर किती राज्य करते हे १३ मार्चला कळेल.

स्वप्निल जोशीसह तेजस्विनी पंडित ही समांतरमध्ये त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. स्वप्निल हा समांजरच्या माध्यमातून वेबसिरीजच्या दुनियेत पाऊल टाकत आहे. सतीश राजवाडेंच्या दिग्दर्शनाचा तर सवालच नाही. त्यांनी आतापर्यंत अग्निहोत्र, रूद्रम, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा दर्जेदार मालिका सतीश राजवाडेंनी दिल्या आहेत. आता सतीश राजवाडे वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

समांतर ही वेबसिरीज केवळ हिंदीत नसून मराठी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होईल. समांतर ही कथा दुनियादारी फेम प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची असून ती वेबसिरीजच्या माध्यमातून साकारायला मिळणार हे माझं भाग्य आहेस, असे सतीश राजवाडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi webseries Samantar will released on 13 March