
गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन सरपंच म्हणून डान्स करणा-या काकूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला लाखो व्ह्युज आणि लाईक्स मिळाले.
मुंबई - सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ट्रेडिंग राहताना दिसत आहेत. त्या व्हिडिओनं युझर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आजकाल सोशल मीडियातून चर्चेत राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळे पोस्ट करणे, त्याचे लाईक्स आणि कमेंटस पाहणे हा नवीन फंडा तरुणाईचा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन सरपंच म्हणून डान्स करणा-या काकूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला लाखो व्ह्युज आणि लाईक्स मिळाले. अक्षय कुमारच्या बाला या गाण्यावर त्यांनी केलेला डान्स सुपरहिट झाला होता. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरदेवाच्या समोर नाच रे मोरा आंब्यांच्या बनात नाच, या गाण्यावर एक तरुण नाचत आहे. त्याचा तो डान्स एवढा भन्नाट आहे की त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या मिरवणूकीमध्ये इतर जे कोणी नाचत आहेत त्यांनीही आपले नाचणे थांबवले जेव्हा त्याचा डान्स सुरु होता.
हा डान्स पाहून मोरपण खुश झाला असता pic.twitter.com/VFMLmbU6B3
— Priyanka kulkarni (@Priyank29202752) February 17, 2021
साधारण एक ते दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या व्हाट्स अपच्या स्टेटसला ठेवला आहे. कित्येकांनी फेसबूक, इंस्टावर तो पोस्ट केला आहे. यामुळे मात्र नवरदेवाच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली आहे. त्यानंही आपल्या मित्राच्या डान्सचे कौतूक केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
हेही वाचा : इतरांपेक्षा वेगळं! लग्नविधीत दियाचा महत्त्वाचा निर्णय; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
मागील आठवड्यात एका गावातील लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातील एक मुलगा दुस-या मुलाला शिव्या देताना ए शंकरपाळ्या असे म्हणतो. हा व्हिडिओ तुफान लोकप्रिय झाला होता. त्याच्या पाठोपाठ नाच रे मोराचा हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.