मॅक्‍स इमर्जिंग स्टार्सचा ग्रॅंड फिनाले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

विजेत्यांची निवड करणाऱ्या परीक्षकांमध्ये प्रसिद्ध डान्स गुरु टेरेन्स लुईस, प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रतनानी आणि अभिनेता, सुपरमॉडेल आणि मॅक्‍स इमर्जिंग स्टारचे प्रोजेक्‍ट हेड मार्क रॉबिन्सन यांचा समावेश होता.

मॅक्‍स इमर्जिंग स्टारचा अंतिम सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये पार पडला. या अंतिम सोहळ्यात मिस्टर मॅक्‍स इमर्जिंग स्टारचा किताब भुवनेश्‍वरच्या इम्तियाज हक आणि मिस मॅक्‍स इमर्जिंग स्टारचा किताब चंडीगडच्या हरनाज कौर संधूने पटकावला. या स्पर्धेसाठी भुवनेश्‍वर, चंडीगड, जयपूर, लखनऊ, वडोदरा आणि विझाग यासह विविध शहरांतील युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना टेरेन्स लेविस यांच्या प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये डान्स सेशन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांचे पोर्टफोलिओ फोटो शूट डब्बू रतनानी करतील. 

दोन महिन्यांच्या विविध ऑडिशन्समधून दहा अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. विजेत्यांची निवड करणाऱ्या परीक्षकांमध्ये प्रसिद्ध डान्स गुरु टेरेन्स लुईस, प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रतनानी आणि अभिनेता, सुपरमॉडेल आणि मॅक्‍स इमर्जिंग स्टारचे प्रोजेक्‍ट हेड मार्क रॉबिन्सन यांचा समावेश होता. विजेत्यांची निवड त्यांच्यामधील अभिनय, नृत्य याविषयी असलेली बुद्धिमत्ता आणि फॅशनविषयीची जाण या गुणांच्या आधारे करण्यात आली. मॅक्‍स फॅशनचे रघु राजागोपालन म्हणाले, "मॅक्‍स इमर्जिंग स्टार 2018च्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रतिभा, बुद्धिमत्ता रॅम्पवर दाखविता येणाऱ्यांसाठी मॅक्‍स इमर्जिंग स्टार हा एक अनोखा खजिना आहे. अशा युवकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ देण्यात मॅक्‍स फॅशनला अभिमान वाटतो. ''  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Max Emerging Star Grand Finale