esakal | 'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक
sakal

बोलून बातमी शोधा

'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक

'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना'मध्ये Maza Hoshil Naएक विलक्षण वळण आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की आदित्यला जेडीच्या ऑफिसमध्ये काही असे पुरावे सापडतात जे आदित्यच्या भूतकाळाशी जोडलेले असावेत असं त्याला वाटतं. त्यामुळे तो पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतो. पण ही खबर जेडी पर्यंत पोहोचते आणि तो आदित्यवर हल्ला घडवून आणतो. सई तिथे वेळेत पोहोचते, त्यामुळे आदित्यचा जीव थोडक्यात बचावतो आणि तो मृत्यूशी झुंज देऊन अखेर वाचतो. (maza hoshil na upcoming episode updates major twist in the story)

आता मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील की आदित्यचा खऱ्या ओळखीबद्दल जेडीला माहित झालंय. म्हणूनच त्याने आदित्यवर हल्ला केलाय असा मामांना अंदाज येतो. त्यामुळे ते आदित्यला घरी परत ये हा आग्रह करतात पण तो नकार देतो. दुसरीकडे आदित्यच्या भूतकाळाबद्दल त्याला आणि जगाला सगळं खरं सांगायचं आणि कंपनी आदित्यला सोपवायची असं मामा ठरवतात. आदित्यला त्याच्या भूतकाळाबद्दल सर्व खरं कळेल का? आदित्यच कंपनीचा खरा मालक आहे हे सर्वांना पटेल का? जेडी अजून काही डाव साधून आदित्यला अडचणीत आणेल का?हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

हेही वाचा: 'माझा होशील ना'च्या सेटवर आमरस पार्टी

'माझा होशील ना' या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी आदित्यची तर अभिनेत्री गौतमी देशपांडे ही सईची भूमिका साकारतेय. या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. कथेतील रंजक वळण आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे ही मालिका चांगलीच गाजतेय.

loading image