Bigg Boss 16 winner: रॅपर चा बादशाह ठरला बिग बॉस 16 चा विजेता.. झाला बक्षिसांचा वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MC Stan

Bigg Boss 16 winner: रॅपर चा बादशाह ठरला बिग बॉस 16 चा विजेता.. झाला बक्षिसांचा वर्षाव

टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता रिअ‍ॅलिटी शो राहिला आहे. शोच्या 16 व्या सीझनला प्रेक्षकांचे फार प्रेम मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला हा शो अखेर संपुष्टात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता संपली आहे. शोच्या या सीझनच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे.

या स्पर्धेचा विजेता एम सी स्टॅन ठरला आहे. अनेकांना असे वाटत होते की प्रियंका किंवा शिव या स्पर्धेत विजयी ठरतील. पण असं झालं नाही.एम सी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता झाला आणि त्या लखलखणाऱ्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

एम. सी स्टॅनला 31 लाख 80 हजार इतकी प्राईझ मनी मिळाली आहे. याशिवाय आलिशान हुंडाई गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे

बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपर म्हणून एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तो बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो विजेता होईल असे भाकित अनेकांनी वर्तवले होते. याला दुसरे कारण म्हणजे त्याचा असणारा प्रचंड चाहतावर्ग.

केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये एमसी स्टॅनचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यानं अमाप संपत्ती कमावली आहे. त्या संपत्तीचा गर्व कधीकधी एमसी स्टॅनच्या बोलण्यातूनही दिसून येतो.

बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनच्या चाहत्यांची भावना होती की, तो विजेतेपद मिळवेल आणि तसेच झाले. तो शेवटी बिग बॉस १६ चा विजेता ठरला. एमसी स्टॅनचे व्यक्तिमत्व पाहून तो बिग बॉसमध्ये खळबळ उडवून देईल असे वाटले होते.

स्टॅनला त्यानंतर मंडलीची साथ मिळाली. म्हणून तो जास्तीत जास्त लोकप्रिय झाला आहे. मंडलीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यानं साजिद खान आणि शिव ठाकरेला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या दिवसापासून एमसी स्टॅन हा वैयक्तिक खेळताना दिसलेला नाही. त्यावरुनही त्याच्यावर टीका होताना दिसत होती.

एमसी स्टॅननं अनेकदा शो मध्ये लोकप्रिय होण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले आहे. त्यानं आपल्याकडे किती संपत्ती आहे, पैसे आहेत याविषयी देखील तो बोलला आहे. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी जोरदारपणे धारेवर धरले होते.

मी किती लोकप्रिय आहे हे त्यानं सांगितलं होतं. तो म्हणाला, बिग बॉसचा जेव्हा प्रीमिअर डे होता तेव्हा तो 80 हजारांची बुटस् परिधान करुन गेला होता.

बिग बॉसमध्ये तो आपल्या कोट्यवधी ज्वेलरीविषयी बोलताना देखील दिसला आहे. अतिशय गरीबीत दिवस व्यतीत केलेल्या एमसी स्टॅननं वयाच्या 12 व्या वर्षांपासून कव्वाली गायला सुरुवात केली. त्यानंतर तो 23 व्या वर्षी रॅपर झाला. आता तो लोकप्रिय गायक झाला आहे. त्याच्या नावाची देशभरात चर्चा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे की, बिग बॉस 16 या सिझनच्या विजेत्याला तब्बल 21 लाख 80 हजार एवढी रक्कम मिळणार आहे. ही रक्कम 50 लाख होईल असं बोलले जात होते. पण तसं केलं गेलेलं नाही.