'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील देवकीला झाली मुलगी!|Meenakshi Rathod good news baby girl | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meenakshi Rathod Sukh Mhanje Nakki kay

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील देवकीला झाली मुलगी!

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडनं गोड बातमी दिली (sukh Mhanje nakki kay Aste) आहे. कैलास वाघमारे (kailash waghmare) आणि मीनाक्षीच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्यांची ही गोड बातमी कळताच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन या दोन्ही कलाकारांचे अभिनंद केले आहे. मीनाक्षी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. त्यातून ती लोकप्रियही झाली. तिचा पती कैलास वेगवेगळ्या नाटकांमधून प्रभावीपणे भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकातील भूमिकेचं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं होतं. काही दिवसांपूर्वी मीनाक्षीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन बेबी बंपचे फोटो व्हायरल केले होते. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कैलास आणि मीनाक्षी हे दोन्ही कलावंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. आता त्यांच्या घरी आलेल्या नव्या पाहुणीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भूमिका घेण्यासाठी ओळखलेल्या कलाकारांमध्ये कैलासची भूमिका आग्रही असते. तो त्यामध्ये सहभागी होवून स्वताची भूमिका ठामपणे मांडताना दिसतो. यापूर्वी देखील त्यानं काही समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांविरोधात परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी मीनाक्षीचं प्रेग्नंसी लूक व्हायरल झाला होता. त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करुन मीनाक्षीला शुभेच्छाही दिल्या होत्या.

Web Title: Meenakshi Rathod Sukh Mhanje Nakki Kay Aste Kailash Nightmare Good News Baby Girl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top