esakal | अभिनेत्री मीरा चोप्राच्या प्लेटमध्ये आढळले जिवंत किडे
sakal

बोलून बातमी शोधा

mera-chopra.jpg

फाईव्ह स्टार हॉटेलची क्रेझ सर्वांनाच असते. त्यात स्वच्छता आणि सर्व सोयीसुविधांमुळे अव्वाच्या सव्वा दर आकरले जातात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्वच्छता आणि सुविधेवर प्रश्न निर्माण झाला आहे. अभिनेत्री मीरा चोप्राला फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवणात जिवंत किडे सापडले आहेत. याबाबतचा व्हिडीओ तिने ट्विटरवर शेअर केला आहे असून व्हायरल झाला आहे.​

अभिनेत्री मीरा चोप्राच्या प्लेटमध्ये आढळले जिवंत किडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फाईव्ह स्टार हॉटेलची क्रेझ सर्वांनाच असते. त्यात स्वच्छता आणि सर्व सोयीसुविधांमुळे अव्वाच्या सव्वा दर आकरले जातात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्वच्छता आणि सुविधेवर प्रश्न निर्माण झाला आहे. अभिनेत्री मीरा चोप्राला फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवणात जिवंत किडे सापडले आहेत. याबाबतचा व्हिडीओ तिने ट्विटरवर शेअर केला आहे असून व्हायरल झाला आहे.

करण जोहरच्या कलंक या चित्रपटात अभिनेत्री मीरा चोप्राने काम केले आहे. अहमदाबाद येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता ऑर्डर केला. मात्र त्यात तिला जिवंत किडे दिसले. तिने या प्रकाराचा व्हिडीओ बनवून तिच्या ट्विटरवर शेअर केला. व्हिडिओमझ्ये तिच्या प्लेटमधील अन्न आणि किडे स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा होणार नाही.

मीरा चोप्राचे करिअर
2005 मध्ये अभिनेत्री मीरा चोप्रानं तमिळ चित्रपट Anbe Aaruyire मधून डेब्यू केला होता
2014 मध्ये मीराने‘गँग ऑफ घोस्ट’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट केला.
2016 मध्ये मीरानं '1920 लंडन' या हॉरर चित्रपटात काम केले आहे.
2019 मध्ये मीराने करण जौहरच्या 'कलंक' चित्रपटात काम केले आहे.
‘सेक्शन 375’ या चित्रपटातही मीरा दिसणार दिसणार आहे. 

loading image
go to top