Meghna Gulzar On Deepika Padukone: 'दीपिकाच्या JNU वादामुळेच...' चार वर्षानंतर दिग्दर्शिका मेघनानं व्यक्त केली मनातील खदखद

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit: चित्रपट निर्माती मेघना गुलजार सध्या तिच्या आगामी 'सॅम बहादूर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit:
Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit:Esakal
Updated on

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit: सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती मेघना गुलजार ही तिच्या हिट चित्रपटांसाठी ओळखली जाते. सध्या मेघना तिच्या आगामी 'सॅम बहादूर' याा चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

विकी कौशल आणि दिग्दर्शक मेघना गुलजार सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता नुकतेच 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या 'एक्स्प्रेस अड्डा' या कार्यक्रमात मेघना गुलजारने तिच्या 'छपाक' या चित्रपटाबाबत मनातील खंत व्यक्त केली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर झालेल्या वादावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या JNU वादाचा परिणाम तिच्या 'छपाक' या चित्रपटावर झाल्याचे मेघनाने मान्य केले आहे.

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit:
Gippy Grewal: 'मी सलमानचा मित्र नाहीच..', लॉरेन्स बिश्नोई गँगने घरावर गोळीबार केल्यानंतर गिप्पी ग्रेवाल घाबरला!

यावर बोलताना मेघना गुलजार म्हणाली, 'मला खात्री आहे आणि माझे उत्तर अगदी स्पष्ट आहे. अर्थातच दीपिकाच्या या गोष्टीचा चित्रपटावर परिणाम झाला. कारण हा चित्रपट अॅसिड हल्ल्याबद्दल होता आणि जेएनयूचा मुद्दा वेगळा होता. मात्र मुद्दा अॅसिड हल्ल्यावरून वाद हिंसाचारापर्यंत गेला. वाद बराच वाढला आणि या सर्व वादाचा परिणाम चित्रपटावर झाला यात काही शंकाच नाही.'

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit:
Gippy Grewal: 'मी सलमानचा मित्र नाहीच..', लॉरेन्स बिश्नोई गँगने घरावर गोळीबार केल्यानंतर गिप्पी ग्रेवाल घाबरला!

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 2020 च्या JNU हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात निदर्शने करण्यात आली. दीपिका पदुकोण तिचा 'छपाक' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधी JNUला गेली होती.

तिथे गेल्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. दीपिका आणि तिचा 'छपाक' चित्रपटाला Boycott करण्याची मागणी करण्यात आली होती. #BoycottChhapaak आणि #BlockDeepika सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाले होते.

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit:
Rohit Bal: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती गंभीर! देतोय मृत्यूशी झुंज

2020 मध्ये, दीपिका पदुकोण आणि विक्रांत मॅसी यांचा 'छपाक' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित होता. अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेली आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लक्ष्मीची भूमिका दीपिकाने साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com