बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये, लायगरमधून पडद्यावर

ज्याच्या बॉक्सिंगनं भल्या भल्यांना पाणी पाजलं. ज्याचं नाव काढताच बॉक्सिंग रिंगमधील अनेकांना घाम फुटायचा अशा माईक टायसनची Mike Tyson कारकीर्द भलतीच वादळी होती.
बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये, लायगरमधून पडद्यावर

मुंबई - ज्याच्या बॉक्सिंगनं भल्या भल्यांना पाणी पाजलं. ज्याचं नाव काढताच बॉक्सिंग रिंगमधील अनेकांना घाम फुटायचा अशा माईक टायसनची Mike Tyson कारकीर्द भलतीच वादळी होती. तो जसा त्याच्या खेळामुळे माहिती होता त्यापेक्षा एक वादग्रस्त बॉक्सर म्हणून जास्त ओळखला गेला. संबंध देशभरात त्याचे लक्षावेधी चाहते आहेत. आपल्या आक्रमक खेळानं त्यानं प्रतिस्पर्ध्यांला नॉक आऊट केलं होतं. टायसननं त्याच्या कारकीर्दित वेगवेगळे विक्रम केले. पंचांशी वादही घातला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तो कमालीचा लोकप्रिय झाला होता. आता तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या लायगर (liger) नावाच्या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याविषयीची अधिक माहिती करण जोहरनं सोशल मीडियावरुन दिली आहे. ब़ॉक्सिंगमध्ये आपल्या खेळानं लोकप्रिय झालेला खेळाडू म्हणून आजही टायसनचे नाव घेतले जाते. तो पहिल्यांदाच बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याला बॉलीवू़डच्या काही चित्रपटांनी प्रभावितही केले होते. असे त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. करण जोहरनं आपल्या सोशल मीडियावरुन लिहिलं आहे की, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदा बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

लायगर हा चित्रपट स्पोर्टसवर आधारित आहे. त्यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांड़े यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर राम्या कृष्णन, चार्मी आणि रॉनित रॉय बोस यांनीही या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लायगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. माईक टायसननं 1985 ते 2005 मध्ये बॉक्सिंगचा बादशहा राहिला. त्याचा आर्यन माईक आणि किड डायनामाईट या नावानं गौरव झाला होता. त्यानंतर त्याला द बेडेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट या पुरस्कारानंही गौरविण्यात आले होते. टायसननं आपल्या पूर्ण करिअरमध्ये 19 प्रोफेशनल फाईट्स नॉक आऊट जिंकल्या होत्या.

बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये, लायगरमधून पडद्यावर
Video: 'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; पत्रकारांना शिल्पा शेट्टीचा प्रतिप्रश्न
बॉक्सिंग रिंगचा किंग बॉलीवूडमध्ये, लायगरमधून पडद्यावर
विजयच्या फॅनसाठी आनंदाची बातमी; 'लायगर'ची तारीख ठरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com