Art director milan passed away during shoot in azerbaijan
Art director milan passed away during shoot in azerbaijanesakal

Art Director Milan Passed Away : प्रसिद्ध कलादिग्दर्शक मिलन कालवश, सुपरस्टार अजितची पोस्ट व्हायरल!

नावाजलेले कलादिग्दर्शक म्हणून मिलन यांची ओळख होती. ते त्यांच्या कामानं ओळखले गेलेले कलाकार होते.
Published on

Art director milan passed away during shoot in azerbaijan : दाक्षिणात्य चित्रपट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध कलादिग्दर्शक मिलन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं टॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. प्रख्यात अभिनेता अजित कुमारनं पोस्ट शेयर करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

नावाजलेले कलादिग्दर्शक म्हणून मिलन यांची ओळख होती. ते त्यांच्या कामानं ओळखले गेलेले कलाकार होते. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. मिलन यांचे जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक आहे. मिलन यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय, अजित कुमार, चियान विक्रम, जयम रवि यांच्यासोबत काम केले होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता.

Also Read - वरी आणि राजगिऱ्यात प्रथिने आणि कर्बोदके नेमकी किती?

१९९९ मध्ये मिलन यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिल यांच्यासोबत त्यांनी डेब्यू केले होते. त्यावेळी त्यांना अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी सर्वाधिक वेळा अजित कुमार यांच्यासोबत चित्रपट केले. त्यात सिटिजन, रेड आणि व्हिलन या चित्रपटांचा समावेश आहे.

Art director milan passed away during shoot in azerbaijan
Kangana Ranaut: देशाचे खरे हिरो कोण? पंतप्रधान मोदींचं कौतुक करत कंगनाच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं, म्हणाली...

याशिवाय थलापती विजयच्या थमिजान आणि चियान विक्रमच्या अन्नियन चित्रपटांना देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. २००६ मध्ये त्यांनी आर्य मधून कला दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बिल्ला,वेट्टाइकरण, थुनिवू, विवेगम, वेदालम आणि सामी २ या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com