Milind Gawali: अण्णांचे अंत्यसंस्कार करुन आलो आणि... जयंत सावरकरांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची भावुक पोस्ट

आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी भावुक पोस्ट शेअर केलीय.
milind gawali emotional post after jayant savarkar passed away aai kuthe kay karte
milind gawali emotional post after jayant savarkar passed away aai kuthe kay karteSAKAL

Milind Gawali on Jayant Sawarkar News: काल सोमवारी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी भावुक पोस्ट शेअर केलीय.

मिलिंद गवळी लिहीतात.. "असं जगता आलं पाहिजे" अण्णांसारखं ( जयंत सावरकरांसारखा ) ,
माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णां आपल्याला शिकवून गेले,आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, वर्षानुवर्ष, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे.

(milind gawali emotional post after jayant savarkar passed away aai kuthe kay karte)

milind gawali emotional post after jayant savarkar passed away aai kuthe kay karte
Om Raut Adipurush: आदीपुरुष वादानंतर ओम राऊत गोव्यातील मंगेशी मंदिरात दर्शनाला

मिलिंद गवळी पुढे लिहीतात.. "१९८४ सालापासून ची आमची ओळख, गोविंद सराया यांच्या "वक्ते से पहिले" मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले, त्यानंतर १९९४-९५ मध्ये मनोहर सररवणकरांच्या "दैव जाणिले कुणी" या दूरदर्शन च्या टेलीफिल्म आम्ही बापलेकाची भूमिका केली त्यानंतर एकदम २०२२-२३ मध्ये "आई कुठे काय करते" मध्ये काम केलं.


म्हणजे तब्बल ३८ वर्षा मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो ,
आता वयाच्या ८६-८७ वर्षाचे अण्णा "आई कुठे काय करते" च्या सेटवर , यायचे अगदी "वेळेवर" call time च्या अर्धा तास आधी. अगदी छान तयार होऊन , एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानस जॅकेट आणि Hat असायची, मग वेळ न घालवता मेकअप करून, costume घालून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे, मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागून घ्यायचे"

मिलिंद गवळी पुढे सांगतात.. मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे, बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बरं एक दोन पानं नाही तर १७ ते १८ पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा suggestions असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे, एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे,

माझी आणि अण्णांची एकच मेकअप रूम होती,
त्यामुळे अण्णांच्या जुन्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची, ते Encyclopedia होते, अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना detail मध्ये आठवायच्या,
बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची, इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh ,active ,energetic असायचे, हसत मुख , Set वर एका professional कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.

milind gawali emotional post after jayant savarkar passed away aai kuthe kay karte
Subhedar Movie: कोंढाणा आणीन स्वराज्यात... सुभेदार सिनेमाची रोमांचकारी नवी झलक समोर

मिलिंद गवळी शेवटी सांगतात.. अण्णां नी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की, ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी, सौभाग्य मिळालं आहे ते खरंच भाग्यवान आहेत,मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो, आत्ता आण्णा शरीराने नाहीत पण यांचा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे, मिश्किल स्वभाव , आयुष्यं कसं छान जगाव. आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com