Milind Gawali: "राजेश खन्ना - गोविंदा बेशिस्त कलाकार असले," आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींच्या पोस्टने चर्चांना उधाण

मिलिंग गवळी सोशल मिडीयावर विविध फोटो अन् व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहीत असतात
milind gawali from aai kuthe kay karte shared post that govinda rajesh khanna are indiscipline actors
milind gawali from aai kuthe kay karte shared post that govinda rajesh khanna are indiscipline actors SAKAL

Milind Gawali News: आई कुठे काय करते मालिकेत नुकतंच इशाचं लग्न झालं. त्यावेळी अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळींचा सुंदर अभिनय पाहायला मिळाला. नुकतीच मिलिंद गवळींनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय.

यात मिलिंद गवळी लिहीतात "असेल हरि तर देईल खाटल्यावरी", किंवा "नशिबात असेल तर मला मिळेल" असं म्हणून चालत नाही. स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे, कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही, कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे."

(milind gawali from aai kuthe kay karte shared post)

milind gawali from aai kuthe kay karte shared post that govinda rajesh khanna are indiscipline actors
लगीनघाई! प्रसाद जवादे - अमृता देशमुख कोणाच्या घरी केळवणाला गेले?

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं,
Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctualmकलाकारांमध्ये अमिताभ बच्चन च नाव घेतलं जातं शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं."

मिलिंद गवळी अशोक सराफ यांचं उदाहरण घेऊन सांगतात, "तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला , तुमचं काम कष्टाच वाटत नाही, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते. की ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल "अरे यार आज शूटिंग आहे" शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन, आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो , अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही."

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशय मध्ये असते, सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते,
दर्शना हजारे शानबाग ने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेत मध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजू मध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com